राजकारण

Bacchu Kadu : 4 नोव्हेंबरला पूर्ण चित्र स्पष्ट होईल, मोठा स्फोट होईल; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य

बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. बच्चू कडू म्हणाले की, महायुती आणि महाविकास आघाडी यांना लोक कंटाळली आहेत. प्रचंड आम्हाला फोन येत आहेत. दोन्ही पक्षातील आघाडी आणि युतीतील लोकांच्या अंतर्गत मारामारी आहे.

चांगल्या उमेदवाराला डावलण्याचा जो प्रयत्न होत आहे. त्याचा फायदा निश्चितच महाशक्तीला होईल. दुसरं जनतेला आम्ही हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. दोघंही धर्म आणि जातीचे मुद्दे घेऊनच लोकांची आतापर्यंत मत घेत आलीत.

4 तारखेला पूर्ण चित्र स्पष्ट होईल आणि मोठा स्फोट होईल. तुम्हाला वाटेल की, हा कसा काय महाशक्तीमध्ये आला. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतरच पिक्चर क्लिअर होईल. विदर्भात चांगले उमेदवार आणि चांगले मतदार संघ आमच्याकडे आलेले दिसणार.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, उमेदवारांच्या ताकदीपेक्षा राजकारण महत्त्वाचा असते. माझ्या मतदारसंघातील लोकांचा जोपर्यंत माझ्यावर विश्वास आहे तोपर्यंत मी तिथूनच लढणार. असे बच्चू कडू म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Meenatai Thackeray Statue : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Latest Marathi News Update live : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींनी घाईघाईने निर्णय घेऊ नका, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Kiran Kale Shivsena UBT : ठाकरेंच्या शिवसेनेच्या किरण काळेंवर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?