राजकारण

यशोमती ठाकूर यांना धक्का! जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी बच्चू कडू

जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नाडी समजल्या जाणारी अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत कॉंग्रेसला मोठा धक्का लागला आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

सूरज दहाट | अमरावती : जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नाडी समजल्या जाणारी अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत कॉंग्रेसला मोठा धक्का लागला आहे. माजी मंत्री बच्चू कडू यांनी खेळी खेळत काँग्रेसची तीन मते आपल्याकडे वळविण्यात यशस्वी झाले आहेत. बच्चू कडू यांनी बॅंकेचं अध्यक्षपद खेचून आणले आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत बच्चू कडू गटातर्फे बच्चू कडू स्वतः अध्यक्षपदासाठी तर सहकारातील नेते अभिजीत ढेपे हे उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक रिंगणात होते. बच्चू कडू व अभिजीत ढेपे या दोघांनाही 11-11 मते मिळाली. तर यशोमती ठाकूर व बबलू देशमुख गटाचे उमेदवार वीरेंद्र जगताप व हरिभाऊ मोहोळ या दोघांनाही दहा-दहा मते मिळाली.

काँग्रेसची या निवडणुकीत तीन मते फुटून ती बच्चू कडू यांच्याकडे वळली गेली. यामुळे यशोमती ठाकूर यांच्या गटाला हा जबर धक्का असल्याचे बोललं जात आहे. यामुळे अध्यक्षपद बच्चू कडू यांनी मिळाले आहे.

दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा बँकेवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांची एक हाती सत्ता होती. शेतकऱ्यांना व संचालकांना त्रास देणाऱ्या हुकूमशहांची हुकूमशाही संपवली आणि जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या दारी घेऊन जाणार ,अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना धनलाभ होण्याची शक्यता, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक सन्मानित व्यक्ती

Malnourished Children : राज्यात कुपोषित बालकांचा आकडा धडकी भरवणारा ; महिला आणि बालविकास मंत्र्यांची माहिती