सूरज दाहाट।अमरावती: राज्यात सध्या प्रचंड राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. त्यातच कुठल्या ना कुठल्या कारणावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये शाब्दिक वाद रंगल्याचे दिसून येते. ह्या सर्व गोंधळादरम्यान, नेहमी आपल्या विधानाने चर्चेत राहणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदार प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी मोठे विधान केले आहे. अमरावतीत एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
नेमकं काय म्हणाले बच्चू कडू?
प्रहार हा आपल्या अमरावतीचा पक्ष आहे. हा काय दिल्ली- मुंबई वाल्यांचा थोडी पक्ष आहे, आपल्या मातीतला आपण निर्माण केलेला पक्ष आहे. लोक आम्हाला म्हणता गद्दारी का केली, मी त्यांना म्हणतो, आम्ही कुठे गद्दारी केली आमचा स्वतंत्र पक्ष आहे. आम्ही कुठेही जाऊ शकतो. आम्हालाही मुख्यमंत्री बनायचं आहे. आमचं पण राजकारण आहे. असं वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केले.