Balasaheb Thackeray Photo on Indian Currency Team Lokshahi
राजकारण

"मला वाटतं नोटांवर बाळासाहेबांचा फोटो असला पाहिजे, पण..." अनिल परबांचं विधान

दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी भारतीय चलनातील नोटांवर असलेल्या फोटोंबाबत केलेल्या मागणीनंतर आता विविध पक्षांतून विविध मागण्या केल्या जात आहेत.

Published by : Vikrant Shinde

जुई जाधव, मुंबई

दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी भारतीय चलनातील नोटांवर असलेल्या फोटोंबाबत केलेल्या मागणीनंतर आता विविध पक्षांतून विविध मागण्या केल्या जात आहेत. आता शिवसेना नेते अनिल परब यांनी या विषयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

या विषयावर काय म्हणाले परब?

  • शिवसनेने अधिकृत मागणी केलेली.

  • शिवसेना हा गरिबांचा पक्ष आहे आम्ही या सगळ्यात पडत नाही.

  • मला असं वाटतं की बाळासाहेबांचा फोटो असला पाहिजे पण, माझ्या वाटण्याने काही होत नाही.

काय म्हणाले होते केजरीवाल?

"आपण सर्वजण दिवाळीला गणपती आणि लक्ष्मीची पूजा करतो. सर्वांनी शांती आणि आनंदासाठी देवाकडे प्रार्थना केली. कुटुंबासहआम्हीही देशाच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली. आपण पाहतो की जे व्यवसाय करतात ते लक्ष्मी-गणेशाची मूर्ती ठेवतात. याच आधारावर या दोघांचं चित्र नोटांवर घेतलं पाहिजे", असे केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी मनसे आणि शिवसेनेचे नेते वरळी येथील डोम सभागृहात दाखल

Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर