Raj Thackeray - Uddhav Thackeray 
राजकारण

Raj Thackeray - Uddhav Thackeray : 'ठाकरे साहेब सभा झाल्यावर फक्त आदेश द्या...'; 5 जूलैच्या विजयी मेळाव्यानिमित्त वरळीत बॅनरबाजी

राज्य सरकारने हिंदी सक्तीचे दोन्ही जीआर रद्द केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विजयी मेळाव्याची घोषणा केली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

(Raj Thackeray - Uddhav Thackeray ) राज्य सरकारने हिंदी सक्तीचे दोन्ही जीआर रद्द केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विजयी मेळाव्याची घोषणा केली आहे. ही विजयी सभा 5 तारखेला होणार आहे. या मेळाव्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

याच पार्श्वभूमीवर आता मुंबईत बॅनरबाजी करण्यात आली आहे. 'ठाकरे साहेब सभा झाल्यावर फक्त आदेश द्या कोणकोणत्या मराठी महाराष्ट्रद्रोही लोकांना सरळ करायचे आहे. आम्ही आदेशाची वाट पाहत आहोत.' असे या बॅनरवर लिहिण्यात आले आहे.

वरळी डोम येथे हा विजयी मेळावा पार पडणार आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचे एकत्र फोटो असलेले बॅनर मुंबईत पाहायला मिळत आहे. या विजयी मेळाव्यातून ठाकरे बंधू काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sanjay Raut PC : 'बहुमत असूनही NDA कडून आमच्या मित्रपक्षाला फोन का केला जातो?' संजय राऊत यांचा सवाल

Mumbai BEST Election Result : शशांक राव यांचा पॅनेल विजयी, ठाकरे बंधूंना मोठा धक्का; फडणवीसांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त, म्हणाले...

Bhandup Accident : भांडूपमध्ये हेडफोनने घेतला तरुणाचा जीव! नेमकं प्रकरण काय?

ST Mahamandal : परिवहन महामंडळाच्या बसमधील वाहक मद्यपान करून झाला झिंगाट, Video Viral