Baramati Malegaon Sahakari Sakhar Karkhana 
राजकारण

Baramati Malegaon Sahakari Sakhar Karkhana : माळेगाव सहकारी साखर कारखाना रणधुमाळी; आज मतमोजणी, मतदारांची पसंती कोणाला?

माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी 22 जून 2025 रोजी मतदान पार पडले.

Published by : Siddhi Naringrekar

(Baramati Malegaon Sahakari Sakhar Karkhana ) माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी 22 जून 2025 रोजी मतदान पार पडले. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मात्र शरद पवार यांनी मतदान केलं नाही.

या निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील बळीराजा पॅनेल, चंद्रराव तावरे यांचे सहकार बचाव पॅनेल आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनेल यांचा समावेश आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याची एकूण मतदारसंख्या 19 हजार 651 इतकी आहे.

बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी प्रक्रिया बारामतीतील प्रशासकीय भवन येथे सकाळी 9 पासून सुरु होणार असून मतदान पेट्या बारामतीमधील शासकीय भवन येथे जमा करण्यात आल्या आहेत. या भागात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

माळेगाव निवडणुकीत पहिल्यांदाच अजित पवार आणि चंद्रराव तावरे यांच्यात थेट लढत होत असल्याचे या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी सुमारे 88.48 टक्के मतदान झाले असून, ब वर्गासाठी 99 टक्के एवढे विक्रमी मतदान झाले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या निवडणुकीत मतदारांनी कोणाला पसंती दिली, हे आज (24 जून) रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतर स्पष्ट होईल. त्यामुळे मतदारांची पसंती कोणाला? हे आज स्पष्ट होणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Donald Trump On Pakistan : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा ; एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल...

Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

Latest Marathi News Update live : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत 42 लाख अपात्र लाभार्थी; अपात्र लाभार्थ्यांकडून रक्कम वसूल केली जाणार?