राजकारण

केंद्रीय अर्थराज्यमंत्र्यांचा म्हाडाच्या घरासाठी अर्ज; त्यांच्यासोबत 'या' आमदारांचेही अर्ज

केंद्रीय अर्थमंत्री भागवत कराडांचा म्हाडाच्या घरासाठी अर्ज

Published by : Siddhi Naringrekar

मुंबईच्या म्हाडाच्या 4082 घरांच्या सोडतीतील सर्वात महागड्या म्हणजेच ताडदेवमधील साडेसात कोटी रुपये किंमतीच्या घरासाठी कराड यांनी अर्ज केला आहे. त्यांच्यासोबत अनेक आजी माजी आमदारांनीही देखिल म्हाडाच्या घरांसाठी अर्ज केला आहे.

जालना जिल्ह्यातील बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे यांनी देखील म्हाडाच्या घरासाठी अर्ज केले आहे. माजी आमदार हिरामण वरखड, आमदार आमश्या पाडवी, यांनीसुद्धा म्हाडाच्या घरांसाठी अर्ज केला आहे. विशेष म्हणजे कराड यांनी अर्ज केलेल्या मुंबईच्या ताडदेवमधील क्रीसेंट टॉवरमधील 142.30 चौ. मीटर क्षेत्रफळाचे हे घर आहे. या घराची किंमत तब्बल 7 कोटी 57 लाख 94 हजार 267 रुपये आहे. तर कराड यांनी हे अर्ज लोकप्रतिनिधींसाठीच्या राखीव प्रवर्गातून केला आहे.

विशेष म्हणजे त्यांनी केलेल्या एकूण 5 अर्जांपैकी केवळ एक अर्ज लोकप्रतिनिधी प्रवर्गातून करण्यात आला आहे. लोकप्रतिनिधी यांना म्हाडाच्या सोडतीत आरक्षण कशाला असा प्रश्न उपस्थित करत याला काही दिवसांपूर्वी विरोध करण्यात आला होता. मुंबईच्या म्हाडाच्या 4082 घरांच्या सोडतीतील सर्वात महागड्या म्हणजेच ताडदेवमधील साडेसात कोटी रुपये किंमतीच्या घरासाठी कराड यांनी अर्ज केला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा