राजकारण

आदिती तटकरेंविषयी आक्षेपार्ह विधान; आता भरत गोगावलेंची सारवासारव, म्हणाले...

भरत गोगावले यांच्या विधानावरुन विरोधकांनी टीकास्त्र डागले आहे. यानंतर आता भरत गोगावलेंनी सारवासारव केली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : पालकमंत्री म्हणून आदिती तटकरेंपेक्षा अधिक चांगलं काम करू. कारण महिला आणि पुरूष यामध्ये थोडासा फरक येतोच, असे विधान शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी केले आहे. या विधानावरुन गोगावले यांच्यावर विरोधकांनी टीकास्त्र डागले आहे. यानंतर आता भरत गोगावलेंनी सारवासारव केली आहे.

सकाळी प्रश्न वेगळा विचारला आम्ही पुरुष असूनही काम करु शकतो. आम्हालाही अनुभव आहे. तीन टर्म आमदार आणि जिल्हा परिषदेचा अनुभव आहे. मीही चांगल काम करू शकतो, असं माझ म्हणायचा उद्देश होता. स्त्री पुरुष विषय नाही मला पालकमंत्री मिळावं असं आमचं म्हणणं आहे, असे स्पष्टीकरण भरत गोगावलेंनी दिले आहे.

पालक मंत्री पद आमच्याकडे राहावं अशी आमची मागणी आहे. जनतेची आणि आमदारांची मागणी आहे की आम्हाला पालकमंत्री पद मिळावं. अदिती यांना मंत्री पद दिलं. यामध्ये काही समस्या नाही. परंतु, त्यांना पालकमंत्री देऊ नये असं आमचं म्हणणं आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

काय म्हणाले होते भरत गोगावले?

पालकमंत्री म्हणून त्यांच्यापेक्षा अधिक चांगलं काम करू. कारण महिला आणि पुरूष यामध्ये थोडासा फरक येतोच ना. आम्हाला गेल्या १५ वर्षांचा आमदारकीचा अनुभव आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊ आणि काम करू. रायगडमधल्या सहाच्या सहा आमदारांची, आम्हा सगळ्यांची एकच मागणी आहे की, रायगडचा पालकमंत्री हा भरतशेट असला पाहिजे. आमची ही मागणी शेवटपर्यंत, अगदी शेवटच्या टोकापर्यंत राहील, असे गोगावलेंनी म्हंटले होते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा