राजकारण

भास्कर जाधवही एकनाथ शिंदेंच्या गटात ?

एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, आम्हाला राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत (ncp and congress) काम करायच नाही आणि महाविकास आघाडीतून (mahavikas aghadi) बाहेर पडायच आहे

Published by : shamal ghanekar

महाराष्ट्राच्या राजकारणात मागील तीन दिवसांपासून खूप घडामोडी सुरू आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, आम्हाला राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत (ncp and congress) काम करायच नाही आणि महाविकास आघाडीतून (mahavikas aghadi) बाहेर पडायच आहे अशीही त्यांनी मागणी केली आहे. तसेच एकनाथ शिंदे (eknath shinde in guwahati) यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केली आणि 40च्यावर आमदारांना गुवाहाटी (guwahati) येथे घेऊन गेले असून अजून शिवसेनेचे काही अमदार एकनाथ शिंदेंच्या गटात हळूहळू समावेश करताना दिसत आहे. तर यावेळी कोकणातील शिवसेनेचे नेते भास्कर जाधवही सध्या नॉट रिचेबल असल्याने चर्चेला होत आहे.

तर शिवसेनेचे भास्कर जाधव एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सामिल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या वतीने जाधव यांनी भाजपला जोरदार विरोध केला होता. परंतु त्यांना मागच्या दोन दिवसांपासून जाधव यांना शिंदे गटाकडून फोन वरून संपर्क केला जात होता. पण त्यांचाशी संपर्क होत नव्हता. संपर्क न होण्यामागे नेमके ते काय कारण होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच ते सुरत मार्गे गुवाहाटीला जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या बंधूची शस्रक्रिया झाल्याने जाधव हे चिपळूणला असल्याची माहिती वरिष्ठ नेत्यांना दिली आहे. तसेच जाधव त्यांच्या गावी आल्याचे सांगण्यात आले आहे.

शिवसेना भवनामध्ये आज राज्यभरातील शिवसेना जिल्हा प्रमुख यांची दुपारी १२ वाजता बैठक होणार आहे. ब.शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतर पहिल्यांदाच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना भवनात बैठक घेणार आहेत.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे समर्थक शिवसेना घटक पक्षाची बैठक घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये शिवसेना विधिमंडळ गटनेते पदी एकनाथ शिंदे आणि प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती केली आहे. आता शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी या बैठकीचा अहवाल पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विधान सभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि विधान परीषद अध्यक्ष रमराजे निंबाळकर यांना पाठवण्यात आले आहे. शिवसेनेच्या या नव्या घटक पक्षाच्या अधिकृत पत्रावर शिवसेनेच्या 37 आमदारांच्या सह्या आहेत.

एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर देत शिवसेनेने बंडखोर आमदारांपैकी 12 जणांची आमदार की रद्द करावी अशीही मागणी विधानसभा उपाध्यक्षांकडे करण्यात आली आहे. पक्षाच्या विधीमंडळ बैठकीत गैरहजर आणि व्हिप काढला असता न आल्याचं कारण देत शिवसेनेने 12 आमदारांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा