राजकारण

राज्यात जातीय दंगलीची शक्यता; शिवसेना नेत्याचे भाकीत

भास्कर जाधव यांचा भाजपवर थेट आरोप

Published by : Shweta Shigvan-Kavankar

लक्ष्मीकांत घोणसेपाटील | रत्नागिरी : राजकीय परिस्थिती पाहता राज्यात जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी शक्यता भास्कर जाधव यांनी केला आहे. गुहागर मतदारसंघात शिवसेनेच्या मेळाव्याला संबोधित करताना भास्कर जाधव यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला. मुंबई महानगरपालिका जिंकायचे असेल तर जातीय दंगली घडवण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही, असा थेट आरोप त्यांनी भाजपवर केला आहे.

भास्कर जाधव म्हणाले की, तुम्ही संपूर्ण देशाचे राजकीय परिस्थिती बघितली तर लक्षात येईल ज्या ज्या राज्यात भारतीय जनता पार्टीचे सत्ता आली. त्या राज्यात निवडणुका पूर्वी जातीय दंगली झाल्या आहेत. जातीय दंगली घडल्या आहेत किंवा जातीय दंगली घडवल्या आहेत हा इतिहास आहे.

शिवसेना संपवण्याचे सर्व मार्ग संपले आहेत. शेवटचा मार्ग म्हणून राज्यात कदाचित जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, तसा प्रयत्न पूर्वी अडीच वर्षांमध्ये झाला आहे. कारण त्यांना मुंबई महानगरपालिका जिंकायची आहे. मुंबई महानगरपालिका जिंकायचे असेल तर जातीय दंगली घडवण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही हे त्यांना कळून चुकलं आहे, असा आरोपही त्यांनी भाजपवर केला.

उद्धव ठाकरे यांचं अतिशय सौम्य आणि सभ्य नेतृत्व राज्यातील सगळ्या जाती-धर्मातील लोकांना भावलेले आहे. मुस्लिम समाजालाही उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व भावले आहे हेच खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीचे दुःख आहे. आम्ही एवढा मोठा शिवसेनेचा पक्ष फोडला व पण बाजूला फक्त 40 आमदार आले. याच्या बदल्यात प्रत्येक ठिकाणी चार लाख लोक शिवसेनेच्या बाजूने गेली हे चित्र आज महाराष्ट्र अनुभवतोय. त्यामुळे भारतीय जनता पार्टी असा काहीतरी उद्योग करू शकते, अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

दरम्यान, अमित शहा आज मुंबई दौऱ्यांवर असून आगामी पालिका निवडणुकींसाठी त्यांनी रणशिंग फुंकले आहे. उद्धव ठाकरे यांनी पाठीत सुरा खुपसला. जनमताचा अपमान केला हे मुद्दे सांगण्यासाठी आता संकोच नको. कानाखाली मारली तर ती शरीराला लागते. मात्र, आपल्या घरासमोर कानाखाली मारली. तर तिचा आवाज अंतर्मनापर्यंत जातो. आता उद्धव ठाकरे यांना जमिन दाखवण्याची वेळ आली आहे. भाजपाच्या समर्थनार्थ प्रत्येक कार्यकर्त्याला मैदानात उतरणं गरजेच आहे. तुम्ही १३५ चे टार्गेट ठेवले आहे. मी १५० नगरसेवक बोलत आहे. मुंबई महापालिकेवर पुढचा महापौर भाजपचाच, असेही अमित शहा यांनी म्हंटले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

PM Narendra Modi : महाकुंभातील संगम आणि सरयू नदीचे पवित्र पाणी, राम मंदिराची प्रतिकृती; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या या खास भेटवस्तू

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Sandeep Deshpande : 'आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका....मेहता बिहता नी...'; संदीप देशपांडेंनी पुन्हा ठणकावलं, मराठी विरूद्ध गुजराती वाद उफाळला

Raj Thackeray - Uddhav Thackeray : 'ठाकरे साहेब सभा झाल्यावर फक्त आदेश द्या...'; 5 जूलैच्या विजयी मेळाव्यानिमित्त वरळीत बॅनरबाजी