प्रशांत जगताप। सातारा: साताऱ्यात शिंदे गटाच्या शिवसेना सातारा जिल्हा संपर्क कार्यालयाला संभाजी भिडे यांनी भेट दिली यावेळी शिवसेना शहर प्रमुख निलेश मोरे यांनी त्यांचे केले स्वागत केलं.यावेळी सातारा जिल्ह्यामध्ये हिंदुत्व ऐक्य आणि सर्वधर्मसमभाव याकरिता शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ही नेहमीच सक्रिय राहील असे भिडे यांनी सांगत हे सरकार हिंदुत्ववादी विचार जपणारे राहिलेच पाहिजे असे आग्रहाचे मत भिडे गुरुजी यांनी यावेळी व्यक्त केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशाप्रमाणे सातारा जिल्ह्यात प्रतापगड येथील अफजलखानाच्या कबरीचे अतिक्रमण हटवण्यात आले.. हे अतिक्रमण अत्यंत गोपनीय पद्धतीने सातारा पोलिसांनी हटविले याबद्दल भिडे गुरुजींनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले.
सातारा जिल्ह्यामध्ये सामाजिक उपक्रम असो किंवा कोणताही संघटनात्मक कार्यक्रम हिंदुत्व आणि प्रेरित असलेले शिवसैनिक त्याचबरोबर राष्ट्रवाद जोपासणारे कार्यकर्ते ही उद्याच्या समाजाची गरज आहे. त्याकरिता अशा विधायक कामांसाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सहकार्य करण्यासाठी केव्हाही तयार आहे. असे स्पष्ट मत भिडे गुरुजी यांनी व्यक्त केले.