Bhupendra Patel Oath  Team Lokshahi
राजकारण

भूपेंद्र पटेल आज दुसऱ्यांदा घेणार गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

गुजरात विधानसभा निवडणूकीमध्ये भाजपाने 156 जागा जिंकून ऐतिहासिक विजय मिळवला आहे.

Published by : shamal ghanekar

नुकतीच गुजरात विधानसभा निवडणुक (Gujarat Assembly Election) पार पडली आहे. या गुजरात विधानसभा निवडणूकीमध्ये भाजपाने 156 जागा जिंकून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. तसेच भूपेंद्र पटेल हे आज दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. भूपेंद्र पटेल यांचा आज शपथविधी सोहळा पार पडणार आहे. गांधीनगरमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे.

या शपथविधी सोहळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह देशभरातील महत्वाचे नेते उपस्थित राहणार असणार आहेत. तसेच अन्य राज्यांतील काही मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. या शपथविधी सोहळ्यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील या सोहळ्याचे आमंत्रण मिळाले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा