राजकारण

Vijay Wadettiwar: 'आश्रम कराड सेक्स स्कँडल'चा मोठा खुलासा; विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

निराधार मुलींना वेश्याव्यवसायात ढकलल्याचा रेखा सकटवर आरोप करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Published by : Dhanshree Shintre

आश्रमाच्या आडून समाजसेविका वेश्याव्यवसाय चालवते असा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. टेंभूतील छत्रछाया वृद्ध व निराधार आश्रमातील धक्कादायक प्रकार आहे. निराधार मुलींना वेश्याव्यवसायात ढकलल्याचा रेखा सकटवर आरोप करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ज्या निराधार मुलींना वाईट कृत्य करायला लावून, काम करायला लावून जर त्यांचं शोषण होत असेल तर अशा व्यक्तींना फाशीची शिक्षा दिली पाहिजे. फक्त एसआयटी स्थापन करा आणि एसआयटी सरकार बनू नका. मागच्या 2 वर्षांमध्ये 2000 एसआयटी स्थापन केल्या.

काय झालं प्रत्येक गोष्टीला गणपत गायकवाडांनी गोळीबार केली दे एसआयटी, अमुख झाला कर एसआयटी उपयोग काय एसआयटी करुन हा SIT सरकार आहे काय? महायुती सरकार म्हणून तुमचं काम हे केवळ एसआयटी स्थापन करु नये त्यात खोलवर जाऊन गुन्हेगारावर वचक बसेल अशा पद्धतीची कारवाई साताऱ्याच्या घटनेमध्ये व्हावी आणि ती तातडीने व्हावी असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : काल एक गद्दार काल बोलला 'जय गुजरात' - उद्धव ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "मराठी शिकणारे शिक्षणमंत्री इंग्रजीमध्ये शिकणारे मुख्यमंत्री..." राज ठाकरेंचा नाव न घेता टोला

Raj Thackeray Live : 'जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलंय'; राज ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला

Raj-Uddhav Thackeray Family Member Vijayi Melava : सहकुटुंब सहपरिवार..; ठाकरे बंधूंचे कुटुंब एकाच व्यासपीठावर