bjp Team Lokshahi
राजकारण

राज्यसभेसाठी भाजपचे 2 उमेदवार जाहीर; तिसराही देणार ?

राज्यातून 'या' नेत्यांना राज्यसभेवर संधी

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने (Shivsena) उमेदवार जाहिर केल्यानंतर भाजपनेही (BJP) अखेरीस नावांची गुपिते उघडली आहेत. महाराष्ट्रातून भाजपाकडून पियूष गोयल (Piyush Goyal) आणि अनिल बोंडे (Anil Bonde) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, शिवसेनेची कोंडी करण्यासाठी भाजप तिसरा उमेदवार देण्याचीही शक्यता आहे. यामुळे विधानसभेची लढत रंगणार असे दिसत आहे.

भाजपकडून आज राज्यसभेच्या 20 जागांसाठी 16 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये पियूष गोयल आणि अनिल बोंडे यांच्यासह अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचेही खासदारकीच्या यादीत नाव आहे. पियुष गोयल यांच्या नावाची चर्चा सुरुवातीपासूनच होती. अखेर त्यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब झाले आहे.

दरम्यान, संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे चार तर भाजपचे दोन सदस्य राज्यसभेवर जाऊ शकतात. राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर भाजपनेही दोन उमेदवारांची नावे जाहिर केली आहेत. परंतु, भाजप राज्यसभेसाठी तिसराही उमेदवार देणार असल्याची चर्चा असून या जागेसाठी धनंजय महाडिक उद्या भरणार असल्याची माहिती भाजपमधील सूत्रांनी लोकशाही न्यूजला दिली आहे. यामुळे शिवसेना-भाजप थेट लढत होणार असल्याने सर्वांचेच डोळे याकडे लागले आहेत.

देशभरात 57 जागांसाठी होत आहे. राज्यसभेच्या 57 जागांपैकी 20 जागांवर भाजपला विजया होईल, असा विश्वास आहे. यानुसार भाजपच्या पहिल्या यादीत 16 नावे असून दुसरी यादीही लवकरच जाहिर करण्यात येणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा