भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीवर आनंद व्यक्त केला आहे. दिल्लीमधील जनतेने भाजपाला निवडून दिले आहे. त्याचप्रमाणे दिल्लीतील जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास आहे. दिल्लीमध्ये आता भाजपाचं सरकार तेथील जनतेला योग्य प्रकारे न्याय देईल ही खात्री आहे. त्याचप्रमाणे त्यांनी आप व कॉँग्रेस या पक्षांच्या अपयशावरदेखील भाष्य केले आहे.
आप पक्षाचे अरविंद केजरीवाल यांचा दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाला. तसेच कॉँग्रेसचीदेखील पीछेहाट झाली. त्यामुळे आप व कॉँग्रेस एकत्र लढले असते तर त्यांना यश मिळाले असते आशा चर्चा सुरू झाल्या. मात्र यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "आप व कॉँग्रेस एकत्र आले असते तरीही त्यांना यश मिळाले नसते".