Chandrashekhar Bawankule | Uddhav Thackeray | Aditya Thackeray Team Lokshahi
राजकारण

'उध्दव ठाकरेंचा स्वार्थ, पुत्र प्रेम जबाबदार...' का म्हणाले बावनकुळे असे?

२०२४ च्या लोकसभा विधानसभा निवडणुका होणार आहेत, सुप्रीम कोर्टाच्या निकालनंतर निवडणुका लागणार आहे.

Published by : Sagar Pradhan

राज्यात सध्या प्रचंड राजकीय घडामोडी घडत आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. हा सर्व वाद सुरु असताना आता शिंदे गट आणि ठाकरे गटातील वाद आणखीच तीव्र झाला आहे. त्यातच काल शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबईत एका कार्यक्रमात बोलत असताना भाजपवर जोरदार टीका केली होती. त्यावरच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उत्तर दिले आहे.

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व टिकवण्यासाठी प्रयत्न केले. पण उद्धव ठाकरे यांनी त्याच हिंदुत्वाच्या पाठीत खंजीर खुपसला. मात्र त्यांना चूक लक्षात आली आहे, माझी चूक झाली हे उशीरा सुचलेले शहाणपण आहे, पण आता बोलता येत नसल्याची परिस्थिती आहे. काँग्रेसची विचारधारा स्विकारुन भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसुन युती तोडली. त्यामुळे युती तोडण्याला जवाबदार हे फक्त उध्दव ठाकरे यांचा स्वार्थ आणि पुत्र प्रेम आहे. सावरकरांचा अपमान होत असताना सरकार जाईल म्हणून तोंडाला पट्टी बांधली, आता हिंदुत्ववावर बोलण्याचा अधिकार उद्धव ठाकरे यांना नाही.असे विधान केले आहे.

पुढे ते म्हणाले की, निवडणुका या लागणारच आहे, ते कोणाच्या हाती नाही. २०२४ च्या लोकसभा विधानसभा निवडणुका होणार आहेत, सुप्रीम कोर्टाच्या निकालनंतर निवडणुका लागणार आहे. आम्ही निवडणुकांना घाबरत नाही, मोदींच्या नेतृत्वात निवडणुका लढवू, उद्धव ठाकरे यांच्या गरळ ओकण्याला जनता धडा शिकवेल, केव्हाही निवडणुका होऊ द्या आम्ही तयार आहोत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर कोणीही बोलू नये. जो निकाल येईल तो मान्य करायल पाहिजे. उद्धव ठाकरे हे निकाल लागण्यापूर्वी निकाल लागल्याची भाषा करत आहेत, शिवसेनेचे लोक सुप्रीम कोर्टाचा निकाल आपल्या बाजूने आला तर योग्य असे म्हणतात विरोधात गेला तर टीका करायला तयार होतात. असं ते यावेळी म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Iran - Israel War : 'विश्वसनीय हमी दिल्याशिवाय कोणत्याही चर्चेला अर्थ नाही'; इराणच्या राजदूतांनी दिला तेहरानच्या अटींवर भर

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Fake Crop Insurance : नांदेडमधील 'बोगस' पीक विमा घोटाळा उघड; बीडचे 9 एजंट, उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या नावानेही विमा

Saamana Editorial : 'शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर दाखवून त्यांनी...'; 'सामना'तून सरकारवर साधला निशाणा