भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. अमरावतीमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, "जेव्हा उद्धव ठाकरेंचे खासदार निवडून आले तेव्हा त्यांच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे होते. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदूत्त्व पायदळी तुडवलं आहे. मतांच्या हव्यासापोटी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले. तयामिळे उद्धव ठाकरे आता औरंगजेब फॅन क्लबचे सदस्य झाले आहेत. पुढच्या काही काळामध्ये ते औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष होतील", असेही बावनकुळे म्हणाले.
संजय राऊतांवर निशाणा :
त्याचप्रमाणे याचवेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. राऊतांवर भाष्य करताना ते म्हणाले की, "संजय राऊत यांचं मला काहीही ऐकायला येत नाही. महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना एकेनं सोडलेलं आहे, त्यामुळे संजय राऊत यांच्यावर बोलून काही फायदा नाही", असा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे.
दिशा सालियन प्रकणावर मौन :
दिशा सालियन प्रकरणाबद्दल बावनकुळे म्हणाले की, "दिशा सालियन प्रकरणातील अंतिम अहवाल येईपर्यंत मी जर काही बोललो तर ते घाई केल्यासारखे होईल".
महाविकास आघाडीला वाट पाहावी लागणार :
2047 पर्यंत माननीय शरद पवार साहेबांना, उद्धव ठाकरेंना आणि काँग्रेसला काही वाव नाही.काँग्रेस आणि महाविकास आघाडीने 2047 पर्यत वाट बघावी.त्यांनी विरोधी पक्षात काम करावं मी त्यांना शुभेच्छा देतो