chandrashekhar Bawankule  Team Lokshahi
राजकारण

ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपच नंबर वन, बावनकुळे यांचे विधान

मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने भाजपा व बाळासाहेबांची शिवसेना युतीला कौल दिला आहे

Published by : Sagar Pradhan

राज्यात राजकीय गदारोळ सुरु असताना एकीकडे काल राज्यातील 1 हजार 165 ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडले आहे. त्या निवडणुकांचा आज निकाल जाहीर झाला आहे.राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील उपलब्ध ८८९ ग्रामपंचायतींच्या निकालांपैकी सर्वाधिक ३९७ ग्रामपंचायती जिंकून भाजपा पुन्हा एकदा नंबरवन पक्ष ठरला आहे. या विजयानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विटर याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये त्यांनी मतदारांचे व कार्यकर्त्यांचे अभिनंदन आणि आभार मानले आहे.

काय म्हणाले बावनकुळे?

ते म्हणाले की, सोमवारी मतगणनेनंतर जिल्ह्याजिल्ह्यातून मिळालेल्यामाहितीनुसार भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना युतीला एकूण ४७८ ग्रामपंचायतीमध्ये विजय मिळाला असून काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांना एकूण मिळालेल्या २९९ ग्रामपंचायतींपेक्षा युतीचे संख्याबळ खूप जास्त आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर दुसऱ्यांदा ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने नव्या सरकारला आणि भाजपा व बाळासाहेबांची शिवसेना युतीला कौल दिला आहे. आपण एकनाथ शिंदे व देवेंद्रफडणवीस यांचे अभिनंदन करतो. असे वक्तव्य यावेळी त्यांनी केले आहे.

ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीला सातत्याने निवडणुकांमध्ये यश मिळत आहे. त्यांच्या विकासाच्या कामगिरीला जनतेची पुनःपुन्हा पसंती मिळत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीतही हेच दिसून आले आहे. असे मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा