eknath shinde | chandrakant patil team lokshahi
राजकारण

एकनाथ शिंदेंची दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद, करणार भूमिका स्पष्ट

चंद्रकांत पाटील एकनाथ शिंदेंच्या भेटीला; गुजरातमध्ये राजकीय घडामोडींना वेग

Published by : Shubham Tate

chandrakant patil : राज्यात विधानपरिषद निवडणुकीसाठी सर्वच पक्षाने कंबर कसली असताना एक मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेनेत (Shiv Sena) अंतर्गत मतभेद असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे हे विधान परिषद निवडणुकीच्या निकालापासून म्हणजेच सोमवारपासुन नॉच रिचेबल आहेत. (bjp gujarat president chandrakant patil meets eknath shinde)

एकनाथ शिंदे सूरतमध्ये असल्याचं बोललं जात आहे. याच ठिकाणाहून एकनाथ शिंदे आपली भूमिका दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद घेत स्पष्ट करणार आहेत. अशातच भाजपा नेते चंद्रकांत पाटील (chandrakant patil) एकनाथ शिंदे यांच्या भेटीला रवाना झाले आहेत. त्यामुळे गुजरातमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

दरम्याान, विधान परिषदेत शिवसेनेचे दोन्ही उमेदवार काठावर पास झाले आहेत. शिवसेनेचे तब्बल 3 आमदार आणि समर्थक अपक्ष आमदारांची 9 अशी एकूण 12 मतं फुटल्याचं कालच्या विधान परिषद निवडणुकी स्पष्ट झालं आहे.

याच पाश्र्वभूमीवर रात्री शिवसेनेने वर्षा बंगल्यावर आमदारांची बैठक बोलावली होती. ही बैठक रात्री दोन वाजेपर्यंत चालली असल्याचे बोलले जात आहे. तसेच आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सर्व आमदारांची वर्षावर तातडीची बैठक बोलावली आहे. शिवसेनेच्या बैठकीला एकनाथ शिंदे हजर राहणार का, याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. शिंदे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील मतभेदाची उघडपणे चर्चा झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. दुसरीकडे आमदारांमध्येही नेतृत्त्वाबाबत नाराजी असल्याचं बोललं जात आहे. एकनाथ शिंदे हे पक्षनेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगत होती. शिवसेनेकडून वारंवार ही चर्चा फेटाळून लावण्यात येत असतानाच आता मात्र मोठी घडामोड घडताना पाहायला मिळत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मनसे - शिवसेनेचा आज मुंबईत विजयी मेळावा

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या कामांना यश मिळण्याची शक्यता , कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?