Chandrashekhar Bawankule  Team Lokshahi
राजकारण

बावनकुळेंनी ठाकरेंना पुन्हा डिवचले; म्हणाले, किंचित सेना...

आज नागपूर विभाग शिक्षक मतदार संघातील भाजप पुरस्कृत उमेदवार नागो गाणार यांच्या प्रचारासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला मतदारांचा मेळावा घेतला. यावेळी बावनकुळे यांनी ही टीका केली आहे.

Published by : Sagar Pradhan

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध सुरु असताना नुकताच शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती झाली आहे. त्यावर आता राजकीय मंडळींकडून प्रतिक्रिया देखील येत आहे. यावरच बोलताना आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे. आज नागपूर विभाग शिक्षक मतदार संघातील भाजप पुरस्कृत उमेदवार नागो गाणार यांच्या प्रचारासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला मतदारांचा मेळावा घेतला. यावेळी बावनकुळे यांनी ही टीका केली आहे.

काय म्हणाले बावनकुळे?

उद्धव ठाकरे यांची किंचित सेना आणि वंचित सेना मिळून भीमसेना होऊ शकत नसल्याचा टोला त्यांनी या नव्या आघाडीवर टीका केली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना नसून ही किंचित सेना असल्याची टीका त्यांनी केली आहे. उद्धव ठाकरे डिवचण्याचेच काम या भाजपने केले आहे. त्यामुळे हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आता वाढली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा