सूरज दाहाट | अमरावती : अमरावतीच्या नवहाथे चौकात आमदार रवी राणा व नवनीत नवनीत राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने दहीहंडीचे आयोजन केले असता तेथील हॉकर्सच्या हातगाड्या हटवून त्याचा रोजगार बुडवल्याच्या आरोप भाजप नेते व माजी गटनेते तुषार भारतीय यांनी केला. नुकसान झालेल्या 100 हॉकर्सला यावेळी प्रत्येकी 2100 रुपयाच्या चेकचे वाटप भाजपकडून केले. त्यामुळे राणा दाम्पत्याला भाजपाकडूनच अमरावतीमध्ये उघड विरोध होताना दिसून येत आहे.
लाखो रुपये खर्च करून नट्या आणता आणि हॉकर्सचा विचार तुम्ही करत नाही. कामाच्या भरोशावर मत मिळत नाही म्हणून नट, सेलिब्रिटी आणायच्या व नेत्यांना गर्दी दाखवायची, पण जनतेला समजते गर्दी कोणाच्या मागे आहे, असा श्रीकांत भारतीय यांचे भाऊ तुषार भारतीय यांनी लगावला आहे. या ठिकाणी दहीहंडीचा राजकीय वापर होत असेल तर हिंदू कसा सहन करेल? देवेंद्र फडणवीस त्या दहीहंडीला अतिथी म्हणून आले होते ते आयोजक नव्हते. मात्र, आम्ही त्यांना हे सगळं सांगणार आहे, असंही ठिकाण भारतीय यांनी सांगितलं. आमचे विचार सत्तेच्या सोयीनुसार बदलवले नाही. काल तुमचे विचार वेगळे होते आता तुमचे विचार बदलले, असा टोला देखील भारतीय यांनी लावला. यावेळी आमदार प्रवीण पोटे यांच्या हस्ते हॉकर्स ला चेकचे वाटप करण्यात आले.
दरम्यान, नवनीत राणांनी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवावी, असे विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते. यानंतर आता अमरावती भाजपने राणा दांपत्यावर टीका केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळातही तर्क-वितर्कांना उधाण आले असून चांगलीच चर्चा रंगली आहे.