Nilesh Rane | Sanjay Raut  Team Lokshahi
राजकारण

उद्धव ठाकरे कंपनीचे लोकं इतके नल्ले, निलेश राणेंची राऊतांवर बोचरी टीका

देवेंद्र फडणवीस ज्यास नॅनो मोर्चा म्हणून हिणवत आहेत तो हाच! महाराष्ट्र प्रेमी जनतेचा बुलंद आवाज. देवेंद्र जी. हे वागणे बरे नाही.

Published by : Sagar Pradhan

महाविकास आघाडीच्या काल मुंबईत महामोर्चा पार पडला. त्या मोर्च्यावरून राज्यात एकच आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहे. त्यातच फडणवीसांनी हा मोर्चा नॅनो मोर्चा असल्याचं म्हटले होते. त्यानंतर मविआकडून त्यांना उत्तर देण्याचे सत्र सुरु झाले. या दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज एक व्हिडीओ ट्वीट केल्यानंतर राजकारण चांगलंच तापलं आहे. राऊतांनी मराठा क्रांती मोर्चाचा व्हिडीओ ट्वीट केल्याचा दावा भाजप आणि मराठा क्रांती मोर्चाकडून केला जात आहे. यामुळे राऊतांवर चहुबाजूने टीका होत आहे. त्यावरूनच आता भाजप नेते निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

काय म्हणाले निलेश राणे?

संजय राऊत यांनी आज एक व्हिडीओ ट्वीट केल्यानंतर राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यावरच अनेक प्रतिक्रिया येत आहे. त्यावरच राणे यांनी ट्विटमधून राऊतांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे कंपनीचे लोकं इतके नल्ले आहेत ते मुंबईच्या मराठा क्रांती मोर्चाचे फोटो एडिट करून टाकत आहेत. सांगून टाका ना लायकी नाही म्हणून. असे बोचरी टीका राणे यांनी केली आहे.

काय होते राऊत यांचे ट्विट?

देवेंद्र फडणवीस ज्यास नॅनो मोर्चा म्हणून हिणवत आहेत तो हाच! महाराष्ट्र प्रेमी जनतेचा बुलंद आवाज. देवेंद्र जी. हे वागणे बरे नाही. जय महाराष्ट्र! असं राऊतांनी व्हिडीओ ट्वीट करत म्हटलं आहे. या व्हिडीओवरुन टीका होऊ लागल्यानंतर राऊतांनी पुन्हा एक ट्वीट करत म्हटलं आहे की, मराठा मोर्चा देखील महाराष्ट्र स्वाभिमान, न्याय्य हक्कांसाठी निघाला. शिवरायांचा जयघोष करीत त्याच मार्गावरून त्याच ताकतीने निघाला. तेव्हा देखील आजच्याप्रमाणे विराट मोर्चाची चेष्टा दबक्या आवाजात हेच लोक करत होते. दोन्ही मोर्चे महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवणारे होते. तूर्त इतकेच! असं राऊतांनी दुसरं ट्वीट करत म्हटलं.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींसाठी चांगला जाईल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या