Aditya Thackeray | Nitesh Rane Team Lokshahi
राजकारण

आदित्य ठाकरेंच्या बापाचं पदच घटनाबाह्य; नितेश राणेंचे टीकास्त्र

भाजप आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : शिवसेना कोणाची ही लढाई सुरू असतानाच ठाकरे गटासमोर आणखी मोठा पेच निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची मुदत आता संपत आली आहे. तर, उद्धव ठाकरे यांचे शिवसेना पक्षप्रमुख पदच अवैध असल्याचा युक्तिवाद काल शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर केला. यावरुन आता भाजप आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरेंच्या वडिलांच पद हे घटनाबाह्य असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

काय म्हणाले नितेश राणे?

आदित्य ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत नितेश राणे यांनी टीकास्त्र डागले आहे. ते म्हणाले की, शिंदे ,फडणवीस सरकार घटनाबाह्य आहे असे बोलणारे आदित्य ठाकरे म्हणत होता आता त्याच्या बापाचं पद घटनाबाह्य आहे. पक्षप्रमुख पद घटनाबाह्य आहे, असा घणाघात राणे यांनी केला.

दरम्यान, 14 फेब्रुवारीला शिवसेनेच्या पक्षाबाबत आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. परंतु, त्याआधीच उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपणार आहे. 23 जानेवारीला उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची पाच वर्षे पूर्ण होणार आहेत. याच मुद्द्यावरुन ठाकरे गटात चिंतेचे वातावरण असतानाच शिंदे गटाकडून पक्षप्रमुख पदच घटनाबाह्य असल्याचे म्हंटले आहे. 2018 मध्ये कार्यकारणीच्या बैठकीत पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची दुसऱ्यांदा निवड झाली होती.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis on Thackeray Brothers : "ब्रँडचा बॅन्ड वाजवला" मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंना खोचक टोला

आजचा सुविचार

North Korea Ban Ice Cream Word : उत्तर कोरियात ‘आईस्क्रीम’ शब्द नॉट अलाऊट! किम जोंग उनचा नवा हुकूम

Lipstick Shades : जाणून घ्या, कोणत्या स्किन टोनवर कोणती लिपिस्टिक सुंदर दिसते