Ram Kadam | Uddhav Thackeray | Aditya Thackeray  Team Lokshahi
राजकारण

शिंदे गटाचा शिवसेना कार्यालयावर दावा, भाजप आमदाराची ठाकरे पिता- पुत्रावर टीका; म्हणाले, ईश्वारीय दंड..

मुंबई महापालिका भाजपा आणी खरी शिवसेना यांचीच... अर्थातच शिंदेजी - फडणवीसजी..

Published by : Sagar Pradhan

शिवसेनेत झालेल्या बंडखोरीपासून शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन पडले. या गटातील वाद दिवसांदिवस वाढतच चालला आहे. खरी शिवसेना नक्की कोणाची हा वाद सुरु असताना आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. शिंदे गटाकडून मुंबई महानपालिकेतील शिवसेना कार्यालयावर कब्जा केला आहे. त्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच विषयावरून आता भाजप आमदार राम कदम यांनी शिवसेना (ठाकरे गटावर) टीका केली आहे.

काय म्हणाले राम कदम?

शिंदे गटाकडून मुंबई महानपालिकेतील शिवसेना कार्यालयावर कब्जा केला आहे. त्यानंतर अनेक नेत्यांची प्रतिक्रिया येत असताना आता भाजप आमदार राम कदम यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे. शिल्लक सेने कडून आज मुंबई महानगर पालिकेतील कार्यालय गेले ही सुरुवात आहे.. हा ईश्वारीय दंड आहे .. स्वर्गीय बाळासाहेबाच्या आजीवन शत्रूना गळाभेट करणाऱ्याना. बाळासाहेबांनी आजन्म ज्याच्याशी सहर्ष केला.. कधीही हात मिळवणी केली नाही.. दुर्दैवाने त्यांचाच नातू आणी मुलगा त्यांच्या दुश्मनाच्या दावणीला गेला.. मुंबई महापालिका भाजपा आणी खरी शिवसेना यांचीच... अर्थातच शिंदेजी - फडणवीसजी.. असे ट्विट त्यांनी केले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मुख्यमंत्र्यांनी केली पंढरपुरातील विठ्ठलाची महापूजा

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर