Sanjay Raut  Team Lokshahi
राजकारण

राऊतांची ठाकरे गटातून हकालपट्टी करावी, लाड यांची ठाकरेंकडे मागणी

राऊतांनी मराठा क्रांती मोर्चाचा व्हिडीओ ट्वीट केल्याचा दावा भाजप आणि मराठा क्रांती मोर्चाकडून केला जात आहे.

Published by : Sagar Pradhan

काल महाविकास आघाडीच्या महामोर्चा पार पडला. त्यानंतर राज्यात राजकीय वर्तुळात एकच आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. त्यातच कालच्या महामोर्चावरुन रंगलेल्या राजकारणानंतर फडणवीसांनी हा मोर्चा नॅनो मोर्चा असल्याचं म्हटले होते. त्यानंतर एकच उत्तर मविआकडून देण्यात येत होते. त्यावरच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज एक व्हिडीओ ट्वीट केल्यानंतर राजकारण चांगलंच तापलं आहे. राऊतांनी मराठा क्रांती मोर्चाचा व्हिडीओ ट्वीट केल्याचा दावा भाजप आणि मराठा क्रांती मोर्चाकडून केला जात आहे. त्यावरून आता भाजप आमदार प्रसाद लाड यांनी राऊतांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे.

काय म्हणाले लाड ट्विटमध्ये?

महाविकास आघाडीने जो मोर्चा काढला होता तो नॅनो मोर्चाच होता.तो मोर्चा महामोर्चा होऊ शकला नाही म्हणून मोठा मोर्चा होता हे दाखवण्याचा प्रयत्न संजय राऊत यांच्याकडून केला जात आहे. त्यामुळे त्यांनी मराठा क्रांती मोर्चातील व्हिडीओ शेअर केले आहेत अशीही टीका त्यांच्यावर करण्यात आली आहे. महाविकास आघाडीचा महोमोर्चा मुंबई निघाला असला तरी तो नॅनो मोर्चा होता.

त्याचमुळे खासदार संजय राऊत यांनी मराठा क्रांती मोर्चाची तुलना काल नॅनो मोर्चाबरोबर केली आहे. हे वाईट कृत्य त्यांनी केल्यामुळे त्यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी करत मराठा समाजाची माफी मागितली पाहिजे. असे लाड यावेळी म्हणाले आहे.

काय होते राऊत यांचे ट्विट?

देवेंद्र फडणवीस ज्यास नॅनो मोर्चा म्हणून हिणवत आहेत तो हाच! महाराष्ट्र प्रेमी जनतेचा बुलंद आवाज. देवेंद्र जी. हे वागणे बरे नाही.जय महाराष्ट्र! असं राऊतांनी व्हिडीओ ट्वीट करत म्हटलं आहे. या व्हिडीओवरुन टीका होऊ लागल्यानंतर राऊतांनी पुन्हा एक ट्वीट करत म्हटलं आहे की, मराठा मोर्चा देखील महाराष्ट्र स्वाभिमान, न्याय्य हक्कांसाठी निघाला.शिवरायांचा जयघोष करीत त्याच मार्गावरून त्याच ताकतीने निघाला.तेव्हा देखील आजच्याप्रमाणे विराट मोर्चाची चेष्टा दबक्या आवाजात हेच लोक करत होते.दोन्ही मोर्चे महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवणारे होते. तूर्त इतकेच! असं राऊतांनी दुसरं ट्वीट करत म्हटलं.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा