राजकारण

Pandharpur Election Result Live| पंढरपुरात भाजपचे समाधान आवताडे आघाडीवर

Published by : Lokshahi News

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडे आघाडीवर आहेत. 30 वी फेरीत आलेल्या मतानुसार भाजपाचे समाधान आवताडे 5910 मतांनी आघाडीवर आहेत तर राष्ट्रवादीचे भगीरथ भालके पिछाडीवर आहेत.

भाजपचे समाधान आवताडे 89 हजार 037 मते असून ते 5910 मतांनी आघाडीवर आहेत. आणि राष्ट्रवादीचे भगीरथ भालके 83 हजार 027 मतांणी पिछाडीवर आहेत. अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांना 51 मते पडली आहेत.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे यांनी खाते देखील उघडले नाही आहे.अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे 10 मते पडली आहेत.

राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके विजयी होणार की भाजपचे उमेदवार समाधान आवताडे बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा