eknath shinde | BJP | Devendra Fadnavis team lokshahi
राजकारण

5 ऑगस्टला मंत्रिमंडळ विस्तार, भाजपच्या 7 तर शिंदे गटातील 5 नावांचा समावेश

येत्या रविवारपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार - दीपक केसरकर

Published by : Team Lokshahi

cabinet expansion : पुणे दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीक कर्ज, धरणातील पाणी, कोरोना प्रादुर्भावाची सद्यस्थिती आणि बूस्टर डोस याबाबत आढावा घेतला. या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षांकडून उपस्थित करण्यात येत असलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. तसंच मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच होणार असल्याचं म्हटलं आहे. (cabinet expansion Eknath Shinde Devendra Fadnavis)

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 5 ऑगस्टला होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर 12 संभाव्य मंत्र्यांची यादीही समोर आली आहे. त्यात भाजपकडून 7 आणि शिंदे गटातील 5 नावांचा समावेश आहे. त्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाचा समावेश आहे. तर शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, दादा भुसेंचाही समावेश करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

शिंदे गटात कुणाला संधी ?

दादा भुसे

अब्दुल सत्तार

गुलाबराव पाटील

उदय सामंत

शंभुराज देसाई

भाजपकडून कुणाला संधी ?

आशिष शेलार

चंद्रकांत पाटील

गिरीश महाजन

चंद्रशेखर बावनकुळे

राधाकृष्ण विखे पाटील

प्रवीण दरेकर

सुधीर मुनगंटीवार

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : तुमची सत्ता असेल ती विधान भवनात - राज ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्यावर मराठी कलाकारांची भावनिक प्रतिक्रिया

Raj Thackeray - Uddhav Thackeray : मेळाव्यासाठी अभूतपूर्व गर्दी, पूर्ण क्षमतेने भरला वरळी डोम; राज - उद्धव यांना ऐकण्यास कार्यकर्ते उत्सुक

Chandu Mama on Raj- Uddhav Thackeray : उद्धव-राज ठाकरे एकत्र! चंदू मामा वैद्य यांच्या प्रयत्नांना यश