राजकारण

PM मोदींची नक्कल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल; सुषमा अंधारे म्हणाल्या, कायदा माझ्या बापाने लिहलायं

महाप्रबोधन यात्रेत शिवसेना नेत्यांनी जोरदार भाषण केले होते. परंतु, हे भाषण आता आता चांगलेच भोवल्याचे दिसत आहे. याप्रकरणी शिवसेनेच्या तीन नेत्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : महाप्रबोधन यात्रेत शिवसेना नेत्यांनी जोरदार भाषण केले होते. परंतु, हे भाषण आता चांगलेच भोवल्याचे दिसत आहे. याप्रकरणी शिवसेनेच्या तीन नेत्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. शिवसेना नेते विनायक राऊत भास्कर जाधव आणि सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर आज सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सुषमा अंधारे म्हणाले की, यात धक्का बसण्यासारखे काहीच नाही. कोणीही सत्य बोलले की त्याला भीती दाखवली जात आहे. पण, मला अद्यापही पोलिसांची कोणतीही नोटीस प्राप्त झाली नाही. मिळाली तर पोलीस ठाण्यात हजर होईल. कारण, कायदा माझ्या बापाने लिहला आहे. त्याचा आदर मी नाही करायचा तर कोणी करायचा. त्या नोटीसीला कायदेशीर उत्तर देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले आहे. तसेच, पंतप्रधान मोदींची नक्कल केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला असेल, तर ती नक्कल नाही. माझ्यापेक्षा जास्त नकला राज ठाकरे यांनी केल्या आहेत. देशात प्रश्न विचारणे आणि सत्य मांडणे गुन्हा असेल, तर हो आम्ही गुन्हेगार आहोत, असेही त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, ठाण्यातील टेंभीनाका येथे शिवसेनेच्या ठाकरे गटाची महाप्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली होती. तर भास्कर जाधव यांनी भाजप नेते गिरीष महाजन यांची नक्कल केली होती. यातून बदनामी झाल्याचा आरोप ठेवत त्यांच्यावर ठाण्याच्या नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यात सुषमा अंधारे, विनायक राऊत भास्कर जाधव, मधुकर देशमुख आणि अनिता बिर्जे यांच्यावर कलम 153, 500 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा