sushama andhare | bhashakar jadhav | vinayak raut  Team Lokshahi
राजकारण

ठाकरे गटाच्या तीन मोठ्या नेत्यांवर ठाण्यात गुन्हा दाखल; प्रक्षोभक, बदनामीकारक भाषण केल्याचा आरोप

ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे, विनायक राऊत भास्कर जाधव, मधुकर देशमुख आणि अनिता बिर्जे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मानहानीकारक वक्तव्य केल्याचा या सर्वांवर आरोप

Published by : Sagar Pradhan

राज्यात सध्या प्रचंड राजकीय घडामोडी घडत असताना अशातच निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटाला नविन नाव आणि चिन्ह दिले आहे. मात्र नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर ठाकरे गटात आनंदाचे वातावरण असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाच्या तीन नेत्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. शिवसेना नेते विनायक राऊत भास्कर जाधव आणि सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील नौपाडा पोलिस ठाण्ंयात या तिघांसह एकूण सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

ठाण्यातील टेंभीनाका येथे शिवसेनेच्या ठाकरे गटाची महाप्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळ्यातील भाषणात सुषणा अंधारे आणि भास्कर जाधव यांनी मानहानीकारक वक्तव्य केल्याचा आरोप ठेवत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सुषमा अंधारे, विनायक राऊत भास्कर जाधव, मधुकर देशमुख आणि अनिता बिर्जे यांच्यावर कलम 153, 500 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडलेल्या कार्यक्रमाला शिवसेनेचे हे नेते उपस्थित होते. यावेळी सुषमा अंधारे आणि भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केली होती. तर, विनायक राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात प्रक्षोभक आणि बदनामी करणारे भाषण केले होते. या प्रक्षोभक भाषणामुळे शिवसेनेच्या सात नेत्यांविरोधात ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.कलम 153,500 आणि 504 तसेच कलम 153 अंतर्गत दोन गटात हाणामारी करण्याच्या उद्देशाने केलेले वक्तव्य केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. तर, कलम 500 ,504 अंतर्गत बदनामी केल्याचा गुन्हा या नेत्यांविरोधात दाखल करण्यात आला आहे.

का आणि कोणी दाखल केला गुन्हा?

या मेळाव्यात सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली होती. तर भास्कर जाधव यांनी भाजप नेते गिरीष महाजन यांची नक्कल केली होती. यातून बदनामी झाल्याचा आरोप ठेवत त्यांच्यावर ठाण्याच्या नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. शिंदे गटाचे बाळा गवस यांनी याबाबत तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीनुसार सर्व नेत्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. 

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मुंबई वेगळं करण्याचा प्रयत्न हाणून पाडला - राज ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्यावर मराठी कलाकारांची भावनिक प्रतिक्रिया

Raj Thackeray - Uddhav Thackeray : मेळाव्यासाठी अभूतपूर्व गर्दी, पूर्ण क्षमतेने भरला वरळी डोम; राज - उद्धव यांना ऐकण्यास कार्यकर्ते उत्सुक

Chandu Mama on Raj- Uddhav Thackeray : उद्धव-राज ठाकरे एकत्र! चंदू मामा वैद्य यांच्या प्रयत्नांना यश