Narayan Rane Team Lokshahi
राजकारण

'राऊत सिंधुदुर्गला लागलेली कीड' राऊतांच्या आरोपावर राणेंची जोरदार टीका

सामना चालत नाही, म्हणून ते ब्रेकींग न्यूज टाकल्या जाव्यात यासाठी प्रयत्न करतात. संजय राऊतांवर बोचरी टीका

Published by : Sagar Pradhan

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच रत्नागिरी येथील पत्रकार शशिकांत वारिसे यांची हत्या करण्यामागे भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची चिथावणी असल्याचा गंभीर आरोप शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. त्यामुळे एकच राजकीय गदारोळ सुरु झाला आहे. पत्रकार शशिकांत वारिसे हत्या प्रकरणाचा नेमका सूत्रधार कोण आहे, हे देवेंद्र फडणवीस यांना पक्कं माहिती आहे. त्याचं नाव समोर येऊ द्या, अशी मागणी संजय राऊत यांनी केली होती. तर विनायक राऊत यांनी थेट राणे पिता-पुत्रांचं नाव घेऊन संशय व्यक्त केला. यावरच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना ठाकरे गट नेते संजय राऊत आणि विनायक राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

नेमकं काय म्हणाले नारायण राणे?

पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या हत्याप्रकरणावर बोलताना म्हणाले की, हे जे घडले आहे ते का घडले, कशामुळे घडले ते पोलीस चौकशीत बाहेर येईल. संजय राऊतांची मी दखल घेत नाही. ते काय महाराष्ट्राचे मोठे नेते असं कोणी नाही. बदनाम आहेत. सामना चालत नाही, म्हणून ते ब्रेकींग न्यूज टाकल्या जाव्यात यासाठी प्रयत्न करतात. अशी टीका त्यांनी राऊत यांच्यावर केली.

पुढे त्यांनी विनायक राऊत यांनी केलेल्या आरोपावर बोलताना म्हणाले की, मी त्या आरोपीला भेटलो नाही. विनायक राऊतला सिंधुदुर्गला काही झालं तरी एकच नाव तोंडावर येते, राऊत सिंधुदुर्गला लागलेली कीड आहे. पत्रकाराच्या मृत्यूशी काही संबंध नाही. चौकशी मध्ये नाव येईल. तेव्हा पाहून घेऊ. अशी जोरदार टीका त्यांनी यावेळी विनायक राऊत यांच्यावर केली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pune Katraj News : पुण्यात आईने बाळाला घरात कुलूपबंद केले, बाळ चालत खिडकीत आले; VIDEO Viral

Women Reservation : महिलांसाठी 35% सरकारी नोकरी आरक्षण; सरकारची मोठी घोषणा

UIDAI ची नवीन घोषणा ; आधारकार्डामध्ये काही बदल करायचे असतील तर...

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे उद्या पुन्हा एकदा एकत्र येणार?