Anurag Thakur  Team Lokshahi
राजकारण

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा काँग्रेसवर घणाघात म्हणाले, भारत जोडो यात्रेत भारताचे तुकडे....

विरोधकांची अवस्था 'एक अनार सौ बिमार'- अनुराग ठाकुर

Published by : Sagar Pradhan

आज केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे महाराष्ट्र दौऱ्यावर होते. या निमित्त त्यांनी काँग्रेसवर जोरदार प्रहार केला आहे. त्यांनी भारत जोडो पासून तर मेमनच्या कबरी प्रकरणावर यावेळी भाष्य केले आहे. माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, याकूब मेमनच्या कबरीबाबत विरोधकांकडून भाजपला लक्ष करण्यात येत आहे. भारत जोडो यात्रेत भारताचे तुकडे करण्याची स्वप्ने रंगविनाऱ्या तुकडे गँगचे लोकच दिसतात. जेएनयूए युनिव्हर्सिटी मध्ये भारताचे तुकडे करणारी पोस्टर चिकटवत 'भारत तेरे तुकडे होंगे हजार, अशा घोषणा देणाऱ्यांना भेटायला जाणाऱ्यांना राहुल गांधी चे भारत जोडो प्रेम खोटे असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

विरोधकांची अवस्था 'एक अनार सौ बिमार' - केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर

भाजप विरोधात विरोधी पक्ष एकत्र येत शरद पवार याचा पंतप्रधान करण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे याबाबत बोलताना ठाकूर यांनी एनडीएची अवस्था 'एक अनार सौ बिमार' ही आज विरोधकांची परिस्थिती झाली आहे. बिहारमध्ये केसीआर आणि नितीशकुमार उठाबशा काढन्यात व्यस्त आहेत . जिथे दोन लोक एकत्र येऊ शकत नाहीत तिथे घटक पक्ष कसे एकत्र येतील असा सवाल करत सर्वजण एकत्र आले तरी काही करू शकणार नाहीत . विरोधकांचे सरकार हे स्वप्न म्हणजे फक्त संगीत खुर्चीच ठरेल असा विश्वास व्यक्त करत कोरोना संकटात जनतेला तारणाऱ्या जनतेचा विश्वास संपादन करणारे पंतप्रधान मोदी समोर कोणीही टिकू शकणार नाही असे सांगितल.

भाजपच्या पोस्टनंतर काँग्रेसने लावलेल्या बॅनरची चर्चा

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे आज कल्याण लोकसभा दौऱ्यावर असताना त्यांचे त्यांच्या मुलासह कल्याण शहरात काँग्रेसने बॅनर लावले आहेत. या बॅनर मध्ये ठाकूर यांच्या मुलाने महागडे टी- शर्ट घातल्याचे निर्देशित करून आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पहायचे वाकून असा आशय लिहले असून केंद्र सरकारचा आणि भाजपचा यावेळी निषेध करण्यात आलाय. कल्याण शहरात काँग्रेसने ठिकठिकाणी हे बॅनर लावले आहेत.भारत जोडो यात्रे दरम्यान राहुल गांधी यांनी घातलेल्या महागड्या टी-शर्ट वरून भाजपाने या राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती.त्याला प्रत्युत्तर कल्याण मधून काँग्रेस पक्षाने दिले आहे.दरम्यान, शहरात या बॅनरची मोठी चर्चा रंगली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : बच्चू कडू यांच्या 'सात बारा कोरा' यात्रेचा आज पाचवा दिवस

Janasuraksha Bill : महाराष्ट्रात 'जनसुरक्षा विधेयक' मंजूर ; नक्षलवाद्यांविरोधात होणार कठोर कारवाई

Pakistan News : ओळख विचारुन पंजाबमधील 9 जणांवर झाडल्या गोळ्या ; धक्कादायक प्रकार समोर

Gold Rate : सोन्याच्या दरात 27% वाढ ; गुंतवणूकदारांना लाभ, मात्र ग्राहकांच्या खिशाला कात्री