राजकारण

'समृद्धी महामार्गाच्या पैशांचा वापर शिवसेना फोडण्यासाठी झाला'

चंद्रकांत खैरेंचा शिंदे-फडणवीस सरकार मोठा आरोपप

Published by : Shweta Shigvan-Kavankar

कमलाकर बिरादार | नांदेड : देवेंद्र फडणवीस, मी व एकनाथ शिंदे आमच्यात 2019 सालीच सत्ता बदलाचा फॉर्म्युला ठरला, असा मोठा गौप्यस्फोट आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केला होता. यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. अशातच, आता ठकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी मोठा दावा केला आहे. शिवसेना फोडण्याला समृद्धी महामार्गाचे संचालक राधेश्याम मोपलवारच जबाबदार असल्याचे चंद्रकांत खैरे यांनी म्हंटले आहे.

शिवसेना फोडण्याला समृद्धी महामार्गाचे संचालक राधेश्याम मोपलवार जबाबदार आहेत. मोपलवारचा त्यात मोठा वाटा असून तेच सगळे मॅनेज करायचे, असेही चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत. समृद्धी महामार्गाच्या पैशांचा वापर शिवसेना फोडण्यासाठी झाला, असाही दावा त्यांनी महाविकास आघाडीच्या भाषणातून आधी केला होता. त्यानंतर आजही ते आपल्या शब्दावर कायम राहिलेत. मोपलवार यांच्यावर खैरेंनी केलेल्या आरोपांमुळे चर्चांना उधाण आल आहे.

तर, महाविकास आघाडीतर्फे 2 एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर येथे वज्रमुठ सभेचे आयोजन करण्यात आल आहे. त्याच दिवशी भाजपतर्फे सावरकर सन्मान रॅली काढणार असून ही रॅली 3 वेगवेगळ्या मतदार संघातून जाणार आहे. आम्ही लोकसभेत ओरडून-ओरडून सांगत होतात की स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न द्या, पण मोदींनी ते ऐकलं का? असा सवालही खैरेंनी भाजपला केला. सावरकरांचे नाव केवळ राजकारणासाठी वापरून राजकारण केलं जातय, असा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, ज्येष्ठ माजी सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना एमएसआरडीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून अनेकदा मुदतवाढ मिळाली आहे. सुमारे ५५ हजार कोटी रुपये खर्चाच्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पात सुरुवातीपासूनच त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. सन २०१८च्या सुरुवातीला मोपलवार निवृत्त होत असतानाच त्यांना फडणवीस, ठाकरे सरकारने सातत्याने मुदतवाढ दिली होती. आता शिंदे सरकारमध्येही त्यांची मुख्यमंत्री सचिवालयात नियुक्ती करण्यात आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा

Sanjay Raut : मुंबईत आज साजरा होणार ‘मराठी विजय दिन’; संजय राऊतांनी सांगितली कार्यक्रमाची रुपरेषा

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्याला मराठी कलाकारांचीही हजेरी

Sudhir Mungantiwar : 'हिंदी शिकणं अवमान, पण इंग्रजी शिकणं अभिमान, असं कसं?'; सुधीर मुनगंटीवार यांचा टोला