राजकारण

संजय शिरसाट हा स्वतःच कॅरेक्टरलेस माणूस; खैरेंचे टीकास्त्र

शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्यावर केलेल्या विधानावरुन ठाकरे गट आक्रमक

Published by : Shweta Shigvan-Kavankar

जालना : शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्यावर केलेल्या विधानावरुन ठाकरे गट आक्रमक झाला असून त्यांच्याविरोधात आंदोलन केले आहे. अशातच, ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे यांनी शिरसाटांवर शरसंधान साधले आहे. संजय शिरसाट हा स्वतःच कॅरेक्टरलेस माणूस असून माझ्याकडे त्यांच्या विषयीची एका महिलेची क्लिप आहे, असा मोठा दावा त्यांनी केला आहे. त्यांनी आज जालन्यात माध्यमांशी संवाद साधला आहे.

संजय शिरसाट हा स्वतःच कॅरेक्टर लेस माणूस असून माझ्याकडे त्यांच्या विषयीची एका महिलेची क्लिप आहे. यात तिने शिरसाट यांच्यावर आरोप केल्याचा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला. तसेच, शिंदे गटाच्या आमदाराने आमच्या बहिणीवर बोलणं थांबवावे. अन्यथा शिवसैनिक भडकून काही पण करू शकतो, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

तर, सुषमा अंधारेंनी शिरसाटांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचे सांगितले आहे. याप्रकरणी अंधारेंनी राज्य महिला आयोगाकडेही तक्रार दाखल केली होती. याची दखल घेत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दखल घेतली असून पोलिसांकडून अहवाल मागितला आहे. यामुळे संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले होते संजय शिरसाट?

आम्ही आमची ३८ वर्षे शिवसेनेसाठी घालवली. आता तुम्ही येऊन आम्हाला मार्गदर्शन करताय. सत्तार भाऊ माझेच भाऊ आहेत, भुमरे भाऊ पण माझेच भाऊ आहेत. ती बाई म्हणते सगळेच माझे भाऊ आहेत. मात्र तिने काय-काय लफडी केली आहे, हे तिलाच माहित. अरे पण तू आहे तरी कोण? असे संजय शिरसाट यांनी म्हंटले होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

GST मध्ये मोठे बदल ; आता 5 टक्के आणि 18 टक्के असे दोन टप्पे

Latest Marathi News Update live : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेवर 2 विशेष गाड्या धावणार; प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचा निर्णय

Atal Setu : अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी

Imran Khan : इम्रान खान यांना मोठा दिलासा; जामीन मंजूर