राजकारण

ती बाई पिक्चरमध्ये सिगारेट ओढते, खैरेंची नवनीत राणांवर जहरी टीका

उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केल्यामुळे शिवसेनेची राणांवर टीका

Published by : Sagar Pradhan

जळगावामध्ये गणेश मंडळाच्या कार्यक्रमात बोलताना नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला होता. त्यांनतर आता शिवसेना नवनीत राणांविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहे. त्यातच आता औरंगाबादचे शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी नवनीत राणांवर विखारी टीका केली आहे.

काय म्हणाले खैरे ?

खैरे यांनी राणा यांना उत्तर देतांना म्हणाले की, जी बाई पिक्चरमध्ये सिगारेट ओढते, ती काय आम्हाला हनुमान चालिसाचं महत्त्व सांगणार? ती आम्हाला शहाणपण शिकवते का? अशा जहरी शब्दात खैरे यांनी नवनीत राणा यांचावर टीका केली आहे.

काय केली होती उद्धव ठाकरेंवर टीका

जळगावात एका गणेश मंडळाच्या कार्यक्रमात नवनीत राणा यांनी उपस्थिती दर्शवत, सामूहिक हनुमान चालिसाच्या पठाण केले. त्यावेळी त्या कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालिसा म्हणण्यासाठी कसं रोखलं आणि त्यावर आपल्या ‘भक्ती’ने कशी मात केली, याबद्दल त्यांनी वक्तव्य केले होते. तेव्हा त्या म्हणाल्या होत्या की, तू ठाकरे है तो मै भी राणा हूँ, मुंबई की बेटी और विदर्भ की बहूं हू.. देखते है किसमे कितनी ताकद है… असा इशारा देत आम्ही हनुमान चालीसाचा आग्रह धरल्याचं राणा यांनी कार्यक्रमात सांगितलं.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा