राजकारण

उध्दव ठाकरेंविरोधात बोलाल तर थोबाड रंगवू; खैरेंचा रामदास कदमांना इशारा

रामदास कदमांच्या 'त्या' वक्तव्याविरोधात चंद्रकांत खैरे आक्रमक

Published by : Shweta Shigvan-Kavankar

औरंगाबाद : शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात शिवसेनेचे नेते आता अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंविरोधात बोलाल तर तुमचे थोबाड रंगवू, असा इशारा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे. ते औरंगाबादेत बोलत होते.

अनेक शिवसैनिकांन खस्ता खाल्ल्यानंतर हा पक्ष मोठा झाला आहे. उद्धव ठाकरे हे वारंवार मी बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा आहे, असे सांगत असतात. अरे पण ही गोष्ट किती वेळा सांगायची. तुम्ही बाळासाहेबांचे पुत्र आहात, याबाबत संशय आहे का?, असा सवाल रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना विचारला होता.

रामदास कदम यांच्या वक्तव्यावर आता राज्यात शिवसेना नेत्यांसह शिवसैनिकही आक्रमक झाले आहेत. राज्यभरात शिवसैनिक रामदास कदमांविरोधात निदर्शने करत आहेत. अशातच रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात चंद्रकांत खैरै यांनी थेट इशाराच दिला आहे. ठाकरेंच्या विरोधात बोलाल तर तुमचे थोबाड रंगवू, असा इशारा रामदास कदम यांना चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे.

तसेच, राज्यात दसरा मेळाव्यावरुन घमासान सुरु असून शिवसेना व शिंदे गट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. शिवाजी पार्कात मेळावा घेण्यासाठी दोन्ही गट आग्रही असताना शिंदे गटाला बीकेसी मैदानाची परवानगी मिळाली आहे. परंतु, शिवसेना अद्यापही मैदानाच्या प्रतिक्षेत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा मेळावा शिवतीर्थावरच होणार असून तेजस ठाकरे राजकारणात सक्रिय होणार असल्याचे खैरे यांनी म्हंटले आहे. दरम्यान, शिवसेनेने शिवाजी पार्क येथे दसरा मेळाव्याची परवानगी मिळण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Saath Nibhana Saathiya Gopi Bahu : 'साथ निभाना साथिया' फेम 'गोपी बहू'ने गुपचुप केले लग्न, जाणून घ्या कोण आहे? जियाचा नवरा

GST Slab : आता अनेक वस्तूंवरील कर दर कमी होणार! GST चे चार पैकी दोन स्लॅब रद्द होणार; सर्वसामान्यांना मोठा दिलासा

Uttar Pradesh Crime : नोरा फतेहीसारखी फिगर मिळवण्यासाठी पतीने केला पत्नीचा छळ; नेमकं प्रकरण काय?

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test