Chandrakant Patil Team Lokshahi
राजकारण

Chandrakant Patil : देवेंद्र फडणवीस यांनी चमत्कार घडवला

चंद्रकांत पाटील यांनी केले देवेंद्र फडणवीसांचे कौतुक

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यसभेची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली. शिवसेनेच्या संजय पवार (Sanjay Pawar) यांचा पराभव करत भाजपचे तीनही उमेदवार निवडून आले आहेत. भाजपच्या (BJP) तिसऱ्या उमेदवाराला विजय मिळवण्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचीच रणनीती कामाला आली. यावर भाजप प्रदेशाध्याक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी ट्विटरवरुन देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे.

माणसं आपलीशी करण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश आले आणि त्यांनी चमत्कार घडवला, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी फडणवीसांचे कौतुक केले आहे. तसेच, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांची खेळी यशस्वी झाली असल्याचे म्हंटले आहे. यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, शरद पवार यांची ही प्रतिक्रिया बोलकी आहे. आमचे देवेंद्र फडणवीसजी आहेतच तसे! प्रतिस्पर्ध्यांच्या यशाचं मनमोकळं कौतुक करणं आणि आणखीही बरंच काही पवारसाहेबांकडून खरोखरच शिकण्यासारखं आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीचे निमित्ताने 9 तासांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर निकाल हाती आले आहेत. भाजपने शिवसेनेला धोबीपछाड देत पियुष गोयल, अनिल बोंडे व धनंनजय महाडिक या तीनही उमेदवारांना विजयी केले आहे. तर संजय पवार यांच्या पराभवामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?

Mahayuti : महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार