राजकारण

Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले...

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, बांगलादेशामधील सत्तापरिवर्तन आणि त्यानंतर हिंदू, बौद्ध आणि तिथल्या अल्पसंख्यांक समुदायाविरोधात सुरू असलेली हिंसा हा अत्यंत गंभीर विषय आहे. केंद्र सरकार यावर पहिल्या दिवसापासून गांभीर्याने व्यक्त होत आहे. पण अर्धवटराव ठाकरे यांना या परिस्थितीतही विनोदबुद्धी सुचते. मला त्यांच्या बुध्दीची कीव करावी वाटते. त्यांच्या देशभक्तीबद्दल प्रश्न निर्माण होतात.

बांगलादेशातील भयंकर, भयानक स्थिती लक्षात न घेता अतिशय बालिश विधाने करून ते आदरणीय मोदींजींची नाही तर हिंसेचे बळी ठरलेल्या हिंदू , बौद्ध आणि इतर समाज बांधवांची थट्टा करत आहेत. ज्यांना याही परिस्थितीत राजकारण सुचते त्यांच्या बौद्धिक क्षमतेवरच प्रश्नचिन्ह लावावे लागेल.काँग्रेसच्या दारात लोटांगण घालून घालून उद्धव ठाकरेंचा बौद्धिक विकास खुंटला असावा. सत्तेसाठी लाचार होऊन त्यांनी याआधीच हिंदुत्वाला तिलांजली दिलीय , आज ते पीडित हिंदूंची थट्टा करीत आहेत.

यासोबतच ते पुढे म्हणाल्या की, हिंदू विरोधी विचारांच्या, दहशतवादी कृत्य करणाऱ्या लोकांना सल्ला देण्यासाठी उद्धव ठाकरे हे अतिशय उत्कृष्ठ सल्लागार आहेत. हल्ली त्यांचा सल्ला हे सगळेच ऐकतात. म्हणून त्यांनी बांगलादेशाचा दौरा करावा. फेसबुक लाईव्ह करावे. बांगलादेशात प्रबोधन करावे. हिंदूंवर अत्याचार होणार नाहीत. हिंदूंच्या हत्या, लूटमार, महिलांवर अनन्वित अत्याचार, मंदिरांवर हल्ले होणार नाहीत, यासाठी पुढाकार घ्यावा. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या शेहजाद्याला दिल्लीत जरूर लोटांगण घालावे, आंतरराष्ट्रीय प्रश्नावर आपले अघाध ज्ञान (?) पाजळू नये. असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा