Chandrashekhar Bawankule  Team Lokshahi
राजकारण

राणा आणि कडू यांना भडकवण्याचं काम कोणीतरी करत आहे - बावनकुळे

आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांना वाद थांबण्याची बावनकुळे यांनी केली

Published by : Sagar Pradhan

शिंदे समर्थक आमदार बच्चू कडू आणि भाजप आमदार रवी राणा यांच्यामध्ये मागील अनेक दिवसांपासून जोरदार शाब्दिक युद्ध सुरु आहे. परंतु हे युद्ध शाब्दिक न राहता खूप पुढे गेला होता. मात्र, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर हा वाद संपला असे दोन्हीकडूनही सांगण्यात आले. परंतु, आज त्याच्यातील हा वाद पुन्हा उफाळून आल्याचे दिसून आले आहे. याच वादावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले बावनकुळे?

बच्चू कडू आणि रवी राणा दोघेही समजदार आहेत. त्यांना भडकवण्याचं काम कोणीतरी करत आहे. या वादातून बाहेर पडावं, अशी विनंतीही रवी राणा आणि बच्चू कडू या दोन्ही आमदारांना बावनकुळे यांनी केली आहे.

पुढे ते म्हणाले की, अमरावती साठी महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. कुठलाही वाद होऊ नये लोकांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून 80 महत्त्वाचे निर्णय झाले आहेत. हे दोघेही राज्य सरकारचे सहयोगी आहेत. या वादावर पडदा पडावा, अशी आमची विनंती आहे.असे आवाहन बावनकुळे यांनी यावेळी केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?