Chandrashekhar Bawankule Team Lokshahi
राजकारण

मविआच्या पायाखालची वाळू सरकली म्हणूनच त्यांच्या उमेदवाराची स्टंटबाजी : बावनकुळे

भाजपने पोलिसांसोबत कसब्यात पैसे वाटल्याचा खळबळजनक आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी करत उपोषण केले.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

कल्पना नळसकर | नागपूर : पुण्यात पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा काल संध्याकाळी पाच वाजता थंडावल्या. अशातच, प्रचार संपताच भाजपने पोलिसांसोबत कसब्यात पैसे वाटल्याचा खळबळजनक आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी करत उपोषण केले. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मतदार भाजपच्या बाजूने आहे. यामुळे महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळू सरकली आहे म्हणून त्यांचा उमेदवार स्टंटबाजी करत आहे. सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

गेले सात दिवस कसबा आणि चिंचवड मधील प्रचारात होतो. मतदार भाजपच्या बाजूने आहे. महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळू सरकली आहे म्हणून त्यांचा उमेदवार स्टंटबाजी करत आहे. सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. प्रचार संपल्यानंतर अशा पद्धतीने प्रचार सुरू ठेवण्याचा कारस्थान आहे. मात्र, ते मतदारांवर पैसे घेतल्याचा आरोप करत आहे. शरद पवारांच्या मंचावरून मुस्लिम मतदारांना कुठूनही या. मात्र, मोदी आणि संघाला पराभूत करा असे आवाहन करण्यात आले आणि त्यानंतर मतदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे त्यामुळेच आजची स्टंटबाजी झाली, असे बावनकुळेंनी म्हंटले आहे.

एखाद्या कुटुंबात जेव्हा मूल होत नाही. तेव्हा दुसऱ्याचा मुल आणून बारस केला जातो. छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या नामांतरण बद्दल ठाकरे गटाचा तसाच आहे. एवढे दिवस सत्ता गाजवली. तेव्हा नामांतरणाचा विचार केला नाही. मात्र, सत्ता जात असताना अल्पमतात असताना कॅबिनेटमध्ये देखावा केला. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा आम्ही नामांतरण केल्याबद्दल अभिनंदन करतो. मोदी आहे तो मुमकिन आहे, असा निशाणा त्यांनी उध्दव ठाकरेंना लगावला आहे.

तर, ओवेसी जर उद्धव ठाकरेंकडे जाणार नसतील तर ओवेसींकडे उद्धव ठाकरे जातील. ज्या समाजवादी पक्षाने रामचरित मानस जाळलं, त्या सपाचे नेते उद्धव ठाकरेंना भेटायला गेले आहे. उद्धव ठाकरेंना काय म्हणावं उद्धव ठाकरेंनी किती खालची पातळी गाठली आहे. मी शंभर टक्के सांगतो ओवेसी जरी यांच्याकडे नाही आले, तरी हे ओवेसींकडे जातीलच. उद्धव ठाकरे यांची एवढी वाईट स्थिती होईल असं महाराष्ट्राने विचारही केलं नव्हतं. सत्तेच्या लालसे पायी उद्धव ठाकरे ओवेसींकडे जातील.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना धनलाभ होण्याची शक्यता, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक सन्मानित व्यक्ती

Malnourished Children : राज्यात कुपोषित बालकांचा आकडा धडकी भरवणारा ; महिला आणि बालविकास मंत्र्यांची माहिती

Deepika Padukone : दीपिका पदुकोण हॉलिवूडमध्ये इतिहास रचणार! 'Walk of Fame'वर स्थान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री