मुंबईच्या कुर्ला परिसरात काल रात्रीच्या सुमारास अत्यंत धक्कादायक घटना घडली. भरधाव असलेल्या बेस्टच्या बसने गाड्यांसह इतर नागरिकांना चिरडलं. यात 5 ते 6 जणांचा मृत्यू झालाय तर 17 ते 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. बस चालकाला मोठ्या गाड्या चालवण्याचा कुठलाही अनुभव नव्हता. पोलिसांच्या तपासात ही धक्कादायक बाब समोर आली आहे. बस चालक 1 डिसेंबरपासून कामावर रुजू झाला असून तो फक्त लहान गाड्या चालवायचा. तरही बेस्टने त्याला कंत्राटी कामावर ठेवलंय. त्यामुळे एकप्रकारे बेस्टकडून बसमधील प्रवाशांच्या जीवाशी खेळ खेळण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा होते आहे. याचपार्श्वभूमीवर महायुतीचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या घटनेबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
अर्धशिक्षित चालकांना बस चालवण्यासाठी देण हे चूक- चंद्रशेखर बावनकुळे
अर्धशिक्षित चालकांना बस चालवण्यासाठी देण हे चूक आहे. कारण त्यांच्यामुळे अशा मोठ्या घटना आणि अपघात होतात. अनेक लोक आज जखमी आहेत तर काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. या अशा कर्मचाऱ्यांना आणि अशा बस चालकाला रुजु करून देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी. त्याचसोबत त्यांची कसून चौकशी देखील झाली पाहिजे. कोणतीही कंपनी असूदेत जर बसमध्ये तांत्रिकी काही चूका असतील तर त्या कंपनीवर देखील कारवाई केली पाहिजे कारण त्या घटनेमध्ये एका कुटुंबातील 6 लोकांचा जीव गेला आहे त्यामुळे कंपनी कोणाची ही असू देत पण त्यांच्यामुळे जर महाराष्ट्रातील असे जीव जात असतील तर त्यांना असं सोडून दिल नाही पाहिजे. मी दोष कोणाचा आहे म्हणत नाही पण यासर्व घटनेचा तपास केला पाहिजे.
संजय राऊत स्वतः ढोंगी आहेत- चंद्रशेखर बावनकुळे
बांगलादेसात होत असलेल्या हिंदू अत्याचारावर संजय राऊतांनी मोदींवर टीका केली आहे. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत आणि मोदी ढोंग करत आहेत अशी टीका संजय राऊतांनी केली आणि त्यांना प्रत्युत्तर देत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, खरं तर बांगलादेश हिंदूच्या पाठीशी सर्वांचा पाठींबा आहे, त्याचसोबत भारतातला हिंदू आहे. पण संजय राऊत तर मजाकबाजी करत आहे. आम्ही सर्व देवेंद्र फडणवीस आणि मोदींच सरकार आम्ही सर्व मिळून यावर काही ना काही तोडगा काढण्याचा आणि निवारण काढण्याचा प्रसत्न करत आहोत. बांगलादेशमधील हिंदूंविषयी सगळ्यांच्या तीव्र भावना आहेत. त्यामुळे यावर ठोस कारवाई होईल असं मला वाटत.