Chandrashekhar Bawankule  
राजकारण

Chandrashekhar Bawankule : सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश; मात्र चंद्रशेखर बावनकुळेंनाच माहीत नाही?, म्हणाले...

आज सुधाकर बडगुजर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी नाशिकमध्ये आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.

त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आली. यातच आज सुधाकर बडगुजर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्या या पक्षप्रवेशाला नाशिकमधील भाजपमधून विरोध पाहायला मिळत आहे.

मात्र स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध डावलून सुधाकर बडगुजर आणि गणेश गीते यांना प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. सुधाकर बडगुजर यांच्याकडून शक्तीप्रदर्शन केलं जाण्याची शक्यता आहे. बडगुजर मोठा ताफा सोबत घेत मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती मिळत आहे.

मात्र, त्याच वेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बडगुजर यांच्या पक्ष प्रवेशाची मला माहिती नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाबाबत संभ्रम निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, 'सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबाबत कुठलीही माहिती माझ्याकडे नाही आहे. जोपर्यंत तिथे स्थानिक आमची सर्व टीम आम्ही जेव्हा पक्षप्रवेश करतो तेव्हा स्थानिक जी टीम असते किंवा स्थानिक पदाधिकारी, आमदार, खासदार असतात. त्यांचे सर्वांचे एकमत झाल्याशिवाय पक्षप्रवेश आमच्याकडे होत नाही. सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबाबत मला कुठलीही माहिती नाही.' असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा