Chandrashekhar Bawankule  
राजकारण

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वचननामा जाहीर; चंद्रशेखर बावनकुळे ट्विट करत म्हणाले...

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आज वचननामा जाहीर करण्यात आला.

Published by : Siddhi Naringrekar

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आज वचननामा जाहीर करण्यात आला. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा वचननामा जाहीर करण्यात आल्या. यामध्ये अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या.

यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, अडीच वर्षे घरात बसून फेसबुक लाईव्ह करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी आज ‘मातोश्री‘त बसून उबाठा गटाचा वचननामा प्रकाशित केला.

अडीच वर्षे फक्त ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी‘ म्हणत स्वतःच्या कुटुंबापुरतं राजकारण केलं. आताही घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आतापर्यंत प्रत्येक वचननामा शिवसेना भवनात प्रकाशित केला. कारण त्यांच्या डोळ्यासमोर महाराष्ट्राचं हित होतं.

पण सच्चा शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त कुटुंबचं आहे. उद्धवजी नेता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो. असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक

Latest Marathi News Update live : राज्यपाल आचार्य देवव्रत छत्रपती शिवाजी पार्कमध्ये

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात खूप प्रगती होईल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार