Chandrashekhar Bawankule 
राजकारण

Chandrashekhar Bawankule : रोहित पवार यांच्या 'त्या' आरोपावर चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

मराठा आंदोलकांच्या काही मागण्यांवर तोडगा काढून त्यांना परत पाठवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केलं जात आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

रोहित पवार यांचा चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर आरोप

चंद्रशेखर बावनकुळे यांची रोहित पवारांच्या आरोपांवर प्रतिक्रिया

'आरोप सिद्ध करा अन्यथा राजकीय संन्यास घ्या', मंत्री बावनकुळेंचं आव्हान

(Rohit Pawar) मराठा आंदोलकांच्या काही मागण्यांवर तोडगा काढून त्यांना परत पाठवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केलं जात आहे. यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. यावरून आता राजकीय नेत्यांमध्ये वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

या जाहीरातीवरुन रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले होते की, 'मा. बावनकुळे साहेब, तुम्ही रोज ४० कोटी ऐवजी ४०० किंवा ४००० कोटीच्या जाहिराती छापा आमचा आक्षेप नाही, पण या जाहिराती निवावी का छापल्या गेल्या? याबद्दल आमचा आक्षेप आहे. कारण निनावी जाहिरात म्हणजे उपकाराची परतफेड असते हे तुम्हाला चांगलं ठाऊक असेल.

या जाहिराती सरकारने दिल्या असतील तर एकीकडं पैसे नाहीत म्हणून योजना बंद केल्या जात असताना, बिले पेंडिंग राहिल्याने कंत्राटदार आत्महत्या करत असताना जाहिराती छापणे म्हणजे जनतेच्या पैशाची उधळपट्टी नाही का?'

'या जाहिराती भाजपने दिल्या असतील तर भाजपने आपल्या नावाने जाहिरात का दिली नाही? भाजपने दिली नाही तर मग एखाद्या कंपनीने किंवा मित्रपक्षाच्या अडचणीत सापडलेल्या नेत्याने उपकाराची परतफेड म्हणून या कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती दिल्या का? उदा. तुम्ही महसूलमंत्री म्हणून ज्या कंपनीचा ९० कोटी रुपयांहून अधिक कोटींचा दंड माफ केला होता, त्या कंपनींने जाहिरात दिली का? या जाहिरातीच्या प्रकरणात काहीही काळेबेरं किंवा लपवण्यासारखं नसेल तर एवढे कोट्यवधी रुपये उधळून जाहिराती कुणी दिल्या, हे आपण जाहीर का करत नाही? करा जाहीर!' असे रोहित पवार यांनी म्हटले होते.

याच पार्श्वभूमीवर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, 'श्री. रोहित पवार जी, फारच मोठ्ठा शोध लावला तुम्ही.!! महसूलमंत्री म्हणून मी कोणत्या कंपनीला ९० कोटींचा दंड माफ केला, हा आरोप सिद्ध करा. अन्यथा, राजकीय संन्यास घ्या. करा सिद्ध !!' असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Nepal Protests : नेपाळमध्ये रस्ते रक्ताने माखले, 14 पेक्षा जण ठार! तरुणांचा संताप उसळला; नेमकं काय घडतंय?

Latest Marathi News Update live : नेपाळमध्ये तरूणांचं आंदोलन! नेपाळमध्ये 26हून अधिक अ‍ॅप्सवर बंदी

Russia : रशियाचा युक्रेनवर 805 ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला

Himachal Rain : हिमाचलमध्ये पावसाचा कहर; 4 हजार कोटींचं नुकसान