(Chhagan Bhujbal) राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून मंत्रिपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज पाहायला मिळालं होतं. यावेळी भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही भेट घेतली होती.
मुंबईत राजभवन येथे हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार असून राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी याबाबत परिपत्रक देखील जारी केलं असून यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाच्या सदस्यांचा शपथविधी समारंभ आयोजित केल्याची माहिती देण्यात आली आहे.
याच पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेण्याआधी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ म्हणाले की, 'ऑल इज वेल, ज्याचा शेवट चांगला ते सगळे चांगले. मी मुख्यमंत्री फडणवीस साहेब, एकनाथराव शिंदे, अजितदादा, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल साहेब यांचे आभार मानतो. मी पंतप्रधान मोदी साहेब आणि अमित शाह साहेब यांचे आभार मानतो. ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. हे सगळं आठ दिवसांपूर्वीच ठरलं, बैठक झाली. असे छगन भुजबळ म्हणाले.