लंडनमधून छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघ नखं महाराष्ट्रात आणली जाणार आहेत. यावरुन राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता चित्रा वाघ यांनी ट्विट केलं आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या की, आम्ही शिवरायांची वाघनखं इंग्लंडवरून आणणार म्हणून इथल्या काही नकली वाघांना पोटशूळ उठला आहे. छत्रपतींनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा काढलात् यांच्या ऐतिहासिकतेविषयी शंका घेणाऱ्या त्यांच्या मर्कटलीला यातूनच आलेल्या आहेत.
पण, त्या वाघनखांची धार आजही तेवढीच तीव्र आहे, जी या नकली वाघांच्या असत्याचा कोथळा बाहेर काढण्यास सक्षम आहे. आपल्या देदीप्यमान इतिहासाशी संबंधित एक मौल्यवान ऐवज या मावळ मातीत दाखल होतोय, त्याचा अभिमान बाळगायचं सोडून वाघनखं आणणाऱ्यांचा दुस्वास करायचा, हे मोठंच करंटेपण आहे पण, काँग्रेसच्या दावणीत गुलामी करणाऱ्या खोट्या वाघांकडून दुसरी अपेक्षा तरी काय करणार…?