राजकारण

संजय राठोड यांच्या शपथविधीवर चित्रा वाघ नाराज; दिला सरकारला घरचा आहेर

शिंदे सरकारचा मंत्रिमंडळाचा शपथविधी आज पार पडला आहे. यावेळी 18 आमदारांचा शपथविधी झाला. यामध्ये बंडखोर आमदार संजय राठोड यांनीही शपथ घेतली.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : शिंदे सरकारचा मंत्रिमंडळाचा शपथविधी आज पार पडला आहे. यावेळी 18 आमदारांचा शपथविधी झाला. यामध्ये बंडखोर आमदार संजय राठोड यांनीही शपथ घेतली. परंतु, यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी नाराजी व्यक्त केली असून सरकारला घरचा आहेर दिला आहे.

संजय राठोड हे तत्कालिन महाविकास आघाडी सरकारमध्ये वनमंत्री होते. यादरम्यान पुजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी त्यांचे नाव समोर आले होते. यावेळी भाजपने त्यांच्याविरोधात रान पेटवले होते. यामुळे त्यांना आपला मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. परंतु, आता शिंदे सरकारमध्ये पुन्हा एकदा त्यांना मंत्रिपदी संधी देण्यात आली आहे. यावर चित्रा वाघ यांनी नाराजी दर्शवली असून शिंदे-भाजप सरकारवर टीका केली आहे.

पुजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्यांच्याविरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास लडेंगे, जितेंगे, असे चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे.

काय होते प्रकरण?

७ फेब्रूवारी २०२१ पूजा चव्हाणने ‌इमारतीवरुन उडी मारून आत्महत्या केली होती. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. दरम्यान, या प्रकरणाशी संबंध असल्याचा आरोप करीत भाजपने संजय राठोड यांना धारेवर धरले होते. त्यानंतर राठोड यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. तर दुसरीकडे या प्रकरणाबाबत वानवडी पोलिसांकडे विचारणा केल्यानंतर त्यांच्याकडून तपास सुरू आहे, असे उत्तर देण्यात आले येत होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?