(Devendra Fadnavis ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शरद पवार यांचे कौतुक करण्यात आले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांचं कौतुक केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "शरद पवार यांच्या अनेक गोष्टी मला आवडतात. पण काही गोष्टी त्यांनी नाही केल्या पाहिजे असे ही मला वाटतं."
"ते जिंकले, हरले किंवा परिस्थिती कशीही असली तरी काम करत राहतात. जय-पराजयाचा विचार न करता शरद पवार सातत्यानं काम करतात. या वयातही ते एवढे काम करतात मला नाही वाटत की कोणी करु शकते." असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकदा एकत्र येण्याच्या चर्चा सुरु असतानाच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत बोलताना शरद पवार यांचे कौतुक केल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.