eknath shinde  Team Lokshahi
राजकारण

धमकीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिक्रिया; म्हणाले, मी भीक घालत नाही...

आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्याची धमकी

Published by : Sagar Pradhan

काही वेळा पूर्वी मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याची माहिती समोर आली होती. मुख्यमंत्र्यांना एका पत्राद्वारे ही धमकी देण्यात आली असून, यावरच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया दिली आहे. यापूर्वीही अशा धमक्या आल्या आहेत. त्यामुळे त्याला मी भीक घालत नाही. असे विधान त्यांनी यावेळी त्यांनी केलं आहे.

यापूर्वीही अशा धमक्या आल्या आहेत. त्यामुळे त्याला मी भीक घालत नाही. धमक्यांमुळे मला जनतेमध्ये जाण्यापासून कोणी रोखूही शकणार नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. त्याच बरोबर गृहविभागाचे अधिकारी हे योग्य ती सुरक्षतेची काळजी घेत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

पुढे ते म्हणाले की, मला जनतेमध्ये राहण्यास आवडते.अशा धमक्यांमुळे माझ्या वागण्यात कोणताही बदल होणार नाही. शिवाय जनतेमध्ये जाण्यास मला कोणीही रोखू शकणार नाही. धमकी पत्रानंतर गृहविभागाने सुरक्षतेची योग्य ती काळजी घेण्यास सुरवात केली आहे. त्याअनुषंगाने गृहविभागाला सूचनाही देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना सांगितले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा