राजकारण

मेहुण्यांवर कारवाईनंतर उद्धव ठाकरे यांची धावपळ

Published by : Jitendra Zavar

महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government)च्या नेत्यांवर ईडीकडून कारवाई करण्यात येत आहे. पण ईडीची (ED) कारवाई आता थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नातेवाईकांपर्यंत यांच्यापर्यंत जाऊन पोहोचली आहे. यामुळे राज्यातील राजकीय गटात खळबळ उडाली आहे. श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्यावर ईडीने (ED) कारवाई केल्यानंतर विधानभवनात असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तात्काळ मातोश्रीकडे निघाले.

कारवाईची माहिती समजल्यानंतर उद्धव ठाकरे स्वत: गाडी चालवत मातोश्रीकडे रवाना झाले. यावेळी त्यांच्याबरोबर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हेही होते. यावेळी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास मात्र त्यांनी टाळलं. आतापर्यंतच्या ईडीच्या कारवाई शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर होत होत्या. पण आता थेट ठाकरे कुटुंबियांपर्यंत ही कारवाई झाली आहे. दरम्यान, मविआ नेत्यांची आज किंवा उद्या एक तातडीची बैठक करतील अशी माहिती आहे, यासंदर्भात नेमकी काय भूमिका घ्यायची याबाबत बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
ईडीच्या कारवाईनंतर हालचालींना प्रचंड वेग आला आहे. राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत . आशुतोष कुंभकोणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा