राजकारण

“देशाच्या राजकारणात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाला सध्या तरी तोड आणि जोड नाही”

Published by : Shweta Chavan-Zagade

भाजप (BJP) राजकारणाच्या किंवा निवडणुकीच्या मैदानात जिंकण्यासाठीच उतरतो, विरोधकांचा पराभव करण्यासाठी नाही. राजकीय विरोधकांना पूर्णपणे उद्ध्वस्त करणे किंवा खात्मा करणे, हा त्यांचा हेतू असतो. देशाच्या राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्त्वाला सध्या तरी तोड आणि जोड नाही. मोदी-शाह (Modi-Shah) आणि त्यांची झुंड निवडणुकीत अत्यंत बेफामपणे उतरते. अशाप्रकारचे निवडणूक कौशल्य सध्याच्या काळात क्वचितच दिसते. ही भूमिका संसदीय लोकशाहीला अत्यंत घातक आहे, अशी टिप्पणी शिवसेनेचे (shivsena) मुखपत्र असलेल्या 'सामना'तून करण्यात आली आहे.

तसेच भविष्यातील विरोधी पक्षांच्या नेतृत्त्वाविषयीही 'सामना'तून प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी म्हटले ते खरे आहे. विरोधी पक्षांत तगडे नेतृत्त्व नाही. त्याचाच फायदा भाजपला होत आहे. हेच त्यांच्या विजयाचे सूत्र आहे. २०२४ पर्यंत असे एखादे सर्वमान्य नेतृत्व लोकांनी निर्माण केले तर भाजपला घाम फुटल्याशिवाय राहणार नाही. चार राज्यांच्या निवडणुकीत भाजपने विजय मिळवला असला तरी त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर होत नसतो. देशासाठी लढाई ही २०२४ मध्येच होईल आणि तेव्हाच ती लढली जाईल, असे 'सामना'त म्हटले आहे.

प्रकृतीने गलितगात्र झालेले लालू यादव ऐन निवडणुकीत तुरुंगात पाठवले जातात व त्याचवेळी सर्वगुणसंपन्न बाबा राम रहिम यांना तुरुंगातून झेड प्लस सुरक्षाव्यवस्थेसह बाहेर काढले जाते. यावर कोणी प्रश्न विचारू शकत नाही. प्रश्न विचारला तर त्याला देशद्रोही किंवा दाऊदचे हस्तक ठरवण्यात येईल. ओवेसी हे उत्तर प्रदेशात मुस्लिमांची मते घ्यायला नव्हे तर हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी अवतरले होते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा